Next
गडचिरोलीत रॅलीद्वारे रस्ता सुरक्षेचा संदेश
प्रेस रिलीज
Monday, February 11, 2019 | 01:33 PM
15 0 0
Share this story



गडचिरोली : जिल्ह्यात ३०वे रस्ता सुरक्षा अभियान चार ते १० फेब्रुवारी २०१९ या कालावधीत राबविण्यात आले. यात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.

आठ फेब्रुवारीला गडचिरोली उप प्रादेशिक परिवहन कार्यालय आणि वाहतूक शाखा यांच्या संयुक्त विद्यमाने येथील कन्या भारती विद्यालयासोबत रस्ता सुरक्षेचा संदेश देणारी रॅली काढण्यात आली. ही रॅलीने वाहतूक शाखा ते चंद्रपूर रोड-गांधी चौक-आरमोरी रोड-धानोरा रोड-चामोर्शी रोड अशी मार्गक्रमणा केली. रॅलीची सांगता वाहतूक शाखेत झाली.  या वेळी विद्यार्थ्यांना रस्ता सुरक्षापर प्रबोधन करण्यात आले.

रॅलीसाठी कन्या भारती विद्यालयातील विद्यार्थिनी आणि सर्व शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते. हा कार्यक्रम  यशस्वी करण्यासाठी उप प्रादेशिक परिवहन अधिकारी रवींद्र भुयार यांच्या मार्गदर्शनाखाली येथील मोटार वाहन निरीक्षक एस. एन. उचगावकर, व्ही. व्ही. अहेर, व्ही. यू. राठोड, वाहतूक शाखा, सहाय्यक पोलिस निरीक्षक लक्ष्मी तांबुसकर  यांनी मेहनत घेतली.
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link