पुणे : आयपार आंतरराष्ट्रीय नाट्य महोत्सवाअंतर्गत नाट्यवाचन स्पर्धा घेण्यात येणार आहे. या स्पर्धेची प्राथमिक फेरी तीन ते १३ ऑक्टोबर या कालावधीत ला सुदर्शन रंगमंच येथे होणार आहे.
गेल्या दोन वर्षांपासून पुणे येथे आयपार आंतरराष्ट्रीय नाट्य महोत्सव साजरा केला जात आहे. गेल्यावर्षीपासून या महोत्सवांतर्गत नाट्यवाचन स्पर्धेला सुरुवात झाली. गेल्यावर्षी ही स्पर्धा केवळ आंतरमहाविद्यालयीन स्तरावर घेण्यात आली होती; मात्र या वर्षीपासून ही स्पर्धा खुल्या गटातही घेण्यात येणार आहे. यंदा ११ ते १८ नोव्हेंबर या कालावधीत होणाऱ्या महोत्सवादरम्यान नाट्यवाचन स्पर्धा तंत्रज्ञानासारख्या प्रभावी माध्यमांच्या आधाराशिवाय सादरीकरण प्रभावी करताना केवळ वाचिक अभिनयाचा कस पाहणारी असणार आहे.
अधिक माहितीसाठी संपर्क : ९८२३१ ६२२७१, ९९२३७ ९६०२४
ई-मेल आयडी : iapar.festival@gmail.com