Next
माँसाहेब जिजाऊ
BOI
Monday, May 13, 2019 | 10:41 AM
15 0 0
Share this article:

पराक्रमी, लढवय्या, रयतेची काळजी घेणाऱ्या शिवबांची जडणघडण झाली ती त्यांची आई जिजाऊंच्या सान्निध्यात. आदिलशाहने शहाजीराजे यांची रवानगी बंगळूरला केल्यानंतर पुण्यातील जहागिरी सांभाळण्याची व लहानग्या शिवबाला घडविण्याची जबाबदारी जिजाबाईंवर आली. त्यांनी प्रथम लाल महाल बांधला. कसब्याला पांढरीवर शिवरायांच्या हस्ते सोन्याचा फाळ चालवून पुण्यातील विकासाचा पाया घातला. शिवराय युद्धनिपुण झाले; तसेच नीती, धर्म, न्याय व भाषा यांची शिकवण जिजाऊंनी दिली. जहागिरीत न्यायविधी व सुव्यवस्थेची काटेकोर अंमलबजावणी जिजाबाईंनी केली. स्वराज्य स्थापक शिवाजी महाराजांना घडविणाऱ्या जिजाबाईंची सार्थ ओळख प्रभाकर बागुल यांनी ‘माँसाहेब जिजाऊ’मधून करून दिली आहे. 

शिवरायांच्या पराक्रमाच्या साक्षीदार असलेल्या जिजाऊंनी केली. स्वराज्य स्थापक शिवाजी महाराजांना माँसाहेबांनी त्यांचा राज्याभिषेकही आनंदाने पहिला. शिवपुत्र संभाजी राजांनी आईची माया देत मोठे केले. हा सर्व इतिहास येथे गोष्टीरूपात वाचायला मिळतो. पत्नी, आई, जनतेची आधारवड, प्रसंगी पुत्राला मार्ग दाखविणारी गुरू, मार्गदर्शिका अशी जिजाबाईंची विविध रूपे यातून समोर येतात.      
     
पुस्तक : माँसाहेब जिजाऊ
लेखक : प्रभाकर बागुल
प्रकाशक : वैशाली प्रकाशन
पाने : ८५
किंमत : ११० रुपये 

(हे पुस्तक ‘बुकगंगा डॉट कॉम’वरून घरपोच मागवण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.)

 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search