Next
स्वप्नील जोशी आता ‘रेडिओ मिर्ची’वर
प्रेस रिलीज
Saturday, October 20, 2018 | 11:34 AM
15 0 0
Share this story

पुणे : रेडिओ मिर्ची या भारतातील पहिल्या क्रमांकाच्या रेडिओ स्टेशनने महाराष्ट्राचा सुपरस्टार स्वप्नील जोशी यांच्यासह एका नव्या शोची घोषणा केली आहे. ‘शेअर इट विथ स्वप्नील’ या नव्या शोची संकल्पना कबुलीजबाबाभोवती फिरते. श्रोते आपले गुपित स्वप्नीलशी शेअर करतील आणि या गुपितांवर स्वप्नील स्वतः विचार करून आपले मत नोंदवणार आहे.

आपल्या विनोदी, हजरजबाबी आणि प्रसन्न स्वभावाने स्वप्नील श्रोत्यांशी कसा संवाद साधणार, हे पाहणे उत्सुकतावर्धक आहे. श्रोत्यांचे कबुलीजबाब ऑन एअर ऐकतानाच, श्रोत्यांना स्वप्नीलची स्वतःची, अन्य कलाकारांची कबुली ऐकण्याची संधीही मिळणार आहे; तसेच विविध समाजमाध्यम व्यासपीठांवर येणाऱ्या विचित्र प्रतिक्रियांविषयीही ‘कुचकट्टा’ या विशेष सेगमेंटमध्ये स्वप्नील भाष्य करणार आहेत.

रेडिओ मिर्चीसह स्वप्नील करत असलेला हा नवा शो मराठी चित्रपटसृष्टीत सध्या चर्चेचा विषय ठरला आहे. या शोमध्ये सोनाली कुलकर्णी (सिनीअर), सोनाली कुलकर्णी, अंकुश चौधरी, सई ताम्हणकर, सचिन पिळगावकर, अमृता खानविलकर, सुबोध भावे आणि अमेय वाघ यांच्यासह अनेक कलाकार आपल्या भावना दिलखुलासपणे व्यक्त करणार आहेत.

हा शो २९ ऑक्टोबर २०१८ पासून सुरू होत असून पुणे, नाशिक, औरंगाबाद, कोल्हापूर, नागपूर आणि अकोला या सहा शहरांमध्ये हा शो प्रसारित होणार आहे.

शोबद्दल बोलताना स्वप्नील म्हणाले, ‘रेडिओ मिर्चीवर ‘शेअर इट विथ स्वप्नील’ हा शो करताना मला फार आनंद होत आहे. हा नाविन्यपूर्ण शो असणार आहे आणि या माध्यमातून श्रोत्यांना आधी कधीही न ऐकलेल्या गोष्टी ऐकण्याची संधी मिळणार आहे. ‘मिर्ची’सोबत हा शो करताना मला जितकी मजा आली, तितकीच मजा श्रोत्यांनाही हा शो ऐकताना येईल, याची मला खात्री आहे. मला आजवर अशा अवतारात लोकांनी पाहिलेले नाही. त्यामुळे, सोडा स्ट्रेस, करा कन्फेस.’

या नव्या सादरीकरणाबद्दल बोलताना रेडिओ मिर्चीच्या आरओएम विभागाचे क्लस्टर प्रमुख एम. एन. हुसैन म्हणाले, ‘एक टीम म्हणून श्रोत्यांना आगळेवेगळे आणि आकर्षक कंटेंट देण्याप्रती आम्ही कटीबद्ध आहोत. या पॅशनमुळेच ‘मिर्ची’ हा ब्रॅंड आज भारतात विशेषतः महाराष्ट्रात अग्रेसर आहे. या शोच्या माध्यमातून श्रोत्यांना आपले न्यूनगंड, कमतरता व्यक्त करण्याची संधी, कबुलीजबाब देण्याची संधी आम्ही देत आहोत. हा शो स्वप्नील पुढे नेत असल्याचा आम्हाला आनंद होत असून, महाराष्ट्रातल्या लोकांसमोर हा शो आणण्यासाठी तोच सर्वोत्कृष्ट आहे.’
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link