Next
‘बजाज’तर्फे नवीन डिस्कव्हर लाँच
प्रेस रिलीज
Friday, January 12 | 02:08 PM
15 0 0
Share this story

मुंबई : बजाज ऑटोने नवीन प्रीमियम एक्झिक्युटिव्ह डिस्कव्हर ११० आणि डिस्कव्हर १२५च्या परिचयाची घोषणा केली. नवीन स्टायलिश लुक्ससोबत, सशक्त प्रदर्शन आणि जागतिक दर्जाचे डबल एलइडी डीआरएल्स (डे रनिंग लाइट्स) हेडलँप्स उपलब्ध आहेत.

२००४मधल्या परिचयापासून डिस्कव्हर ब्रँड आपल्या सर्वोत्तम प्रदर्शन आणि वेगळ्या स्टायलिंगसाठी प्रसिध्द आहे. नवीन डिस्कव्हर ११० आणि १२५ याला सेगमेंट गुणविशेषांमधल्या काही सर्वप्रथम घटकांसोबत आता आणखीन वेगळ्या स्तरावर घेऊन जाणार आहे.
 
या वेळी बोलताना बजाज ऑटो लिमिटेडचे प्रेसिडेंट (मोटरसायकल्स) एरिक वास म्हणाले, ‘बजाजने प्लॅटिना कम्फर्ट टेक आणि सीटी १०० सोबत १००सीसी विभागात अतिशय उद्बोधक प्रभाव पाडला आहे. नवीन डिस्कव्हर ११० आणि १२५, १००-१२५सीसी विभागातील ग्राहकांसाठी प्रिमियम अनुभवाच्या दृष्टीने पहिल्यांदाच गुणविशेष आणत आहे. डिस्कव्हर ग्राहकांच्या अगदी नवीन सेटला आकर्षित करण्यात यशस्वी झाली आहे, ज्यांना आधुनिक तंत्रज्ञानाच्या लाभांची अपेक्षा असते.’    

ते पुढे म्हणाले, ‘नवीन प्रीमियम एक्झिक्युटिव्ह डिस्कव्हरमध्ये एकमेव द्वितिय असे एलइडी डीआरएल हेडलँप्स आहेत जे विशेष विभागात प्रथमच समाविष्ट करण्यात आले आहेत. बाइकला स्टायलिश लुक देण्यासोबत, इंधनामध्ये कोणाताही लक्षणीय प्रभाव पडू न देता ते अगदी दूरवरून दृष्टीपथात पडतात. केवळ प्रिमियम बाइक्समध्ये आढळणारा डिजीटल स्पिडोमीटर आता डिस्कव्हरमध्ये देखील दिसणार आहे.’  

दोन्ही डिस्कव्हर्स नवीन लाँग स्ट्रोक इंजिन्ससोबत येत आहेत, ज्यामध्ये सर्वोत्कृष्ट दर्जाचा टॉर्क आणि पॉवर आहे. यामुळे रहदारीच्या स्थितीतसुध्दा राइड ऊर्जादायक आणि मजेची होते. नवीनच ओळख करून देण्यात आलेली ११०, फोर-स्ट्रोक, एयर कूल्ड, सिंगल सिलेंडर ११५.५सीसी डीटीएस-आय इंजिनसोबत येते जी आघाडीच्या श्रेणीची ८.६ पीएस पॉवर आणि ९.८१ एनएम टॉर्क देते. दुसऱ्या बाजूला डिस्कव्हर १२५, फोर-स्ट्रोक, एयर कूल्ड, सिंगल सिलेंडर १२४.५सीसी डीटीएस-आय इंजिनसोबत येते जी आघाडीच्या श्रेणीची ११ पीएस पॉवर आणि ११ एनएम टॉर्क देते. या डिस्कवर जोडीमध्ये १६ टक्के लांब सस्पेंशन्स आणि एक्स्ट्रा कुशन असलेल्या सीट्स आहेत ज्या दैनंदिन राइडला आरामदायक भासतात.
 
डिस्कव्हर ११० ही बाइक ५० हजार ४४६ रुपयांना (एक्स-शोरूम महाराष्ट्र) आणि डिस्कव्हर १२५ ड्रम व डिस्क आवृत्तीसाठी (एक्स-शोरुम महाराष्ट्र) अनुक्रमे ५३ हजार ४९१ आणि ५६ हजार ३१४ रुपयांमध्ये काळा, लाल आणि निळ्या रंगात उपलब्ध आहे.
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link