Next
आरोग्याच्या गुजगोष्टी
BOI
Monday, August 06 | 10:20 AM
15 0 0
Share this story

आपले शरीर हे आपल्या शेवटच्या श्वासापर्यंत आपल्याया साथ देते. त्यामुळे शरीराचे स्वास्थ्य जपले, तर आपल्या श्वासांचेही स्वास्थ्य जपले जाईल. त्यासाठी काय करायचे  या प्रश्नाचे उत्तर डॉ. मालती कारवारकर यांच्या या पुस्तकातून मिळते.

आहार आणि आरोग्य यांचा थेट संबंध आहे. त्या दृष्टीने डॉ. कारवारकर यांनी प्रारंभी अन्न घटकांचा विचार करून आहाराचा तक्ता दिला आहे. आहाराविषयीचे समज-गैरसमज यांवरही चर्चा केली जाते. तेल, गोड पदार्थ, फास्ट फूड यांचा आरोग्यावर होणार परिणाम सांगितला आहे. ताण हा घटकही आरोग्यावर परिणाम करत असतो. ताणावर मात करण्यासाठी व्यायामाचा वापर कसा करावा, याचे मार्गदर्शन करतात. पोटाचा घेर या काळजीच्या विषयाबरोबरच जीवनशैली, न्युट्रिशन थेरपी, सप्लिमेंट्स, फिटनेस टेस्ट, हार्मोन्समुळे होणारे बदल, स्त्रियांचे आरोग्य या विषयांवरही त्यांनी प्रकाश टाकला आहे.  

प्रकाशक :
मेनका प्रकाशन
पाने : १५७
किंमत : २०० रुपये
      
(हे पुस्तक ‘बुकगंगा डॉट कॉम’वरून घरपोच मागवण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.)

 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link