Next
‘जिओ’तर्फे ग्राहकांसाठी आकर्षक ऑफर्स
प्रेस रिलीज
Wednesday, June 13, 2018 | 12:35 PM
15 0 0
Share this article:

मुंबई : ‘एव्हरीडे मोअर व्हॅल्यू’ (ईडीएमव्ही) सेवा देण्याचे दिलेले आश्‍वासन ‘जिओ’ पाळत असून, इतर कंपन्यांच्या ग्राहकांपेक्षा ‘जिओ’ कंपनी ग्राहकांना कमी शुल्क आकारत आहे. ‘जिओ’च्या सर्व ग्राहकांना जून महिन्यासाठी ही ऑफर उपलब्ध आहे. इतर कोणत्याही ऑपरेटरपेक्षा जिओकडून ग्राहकांना ‘ईडीएमव्ही’अंतर्गत अधिकाअधिक फायदे देत आहे.

नुकतीच ‘एअरटेल’ने १४९ रुपये आणि ३९९ रुपयांच्या प्लॅनवर दररोज एक जीबी अतिरिक्त डेटा देण्याची घोषणा केली. हे केवळ मोजक्‍याच ‘एअरटेल’ ग्राहकांसाठी आहे. ‘एअरटेल’च्या ऑफरला प्रत्युत्तर म्हणून ‘जिओ’ आता ग्राहकांना दररोज अतिरिक्त १.५ जीबी फोर-जी डेटा देणार आहे. डेली रिकरिंग पॅक असलेल्या ग्राहकांना याचा फायदा मिळेल.

१४९, ३४९, ३९९ आणि ४४९ रुपयांचा दररोज १.५ जीबी डेटाचा प्लॅन असलेल्या ग्राहकांना आता दररोज तीन जीबी डेटा मिळणार आहे. १९८, ३९८, ४४८ रुपयांचा दररोज दोन जीबी डेटाचा प्लॅन असलेल्या ग्राहकांना आता दररोज ३.५ जीबी डेटा मिळणार आहे, तर २९९ रुपयांच्या दररोज तीन जीबी डेटाचा प्लॅन असलेल्या ग्राहकांना ४.५ जीबी डेटा मिळणार आहे.

त्याचप्रमाणे ५०९ रुपयांचा दररोज चार जीबी डेटाचा प्लॅन असलेल्या ग्राहकांना ५.५ जीबी डेटा मिळेल, तर ७९९ रुपयांचा दररोज पाच जीबी डेटाचा प्लॅन असलेल्या ग्राहकांना ६.५ जीबी डेटा मिळेल. याचबरोबर ३०० रुपये आणि त्यावरील सर्व रिचार्जेसवर ‘जिओ’ शंभर रुपये डिस्काउंट देणार आहे. ग्राहकाने मायजिओ अॅप अथवा फोनपे वॉलेटमधून केलेल्या ३०० रुपयांपेक्षा कमी किंमतीच्या रिचार्जेसवर २० टक्के सवलत दिली जाणार आहे.

आता ‘जिओ’ ग्राहकांना १४९ रुपयांचा पॅक १२० रुपयांना आणि दररोज तीन जीबी डेटा, मोफत कॉल, एसएमएस आणि जिओ अॅप्स २८ दिवसांसासाठी मिळेल. ३९९ रुपयांचा पॅक २९९ रुपयांना आणि दररोज तीन जीबी डेटा, मोफत कॉल, एसएमएस आणि जिओ अॅप्स ८४  दिवसांसाठी मिळेल. दूरसंचार क्षेत्रातील इतर कंपन्यांच्या तुलनेत जिओ कमी शुल्क आकारणीच्या बाबतीत आघाडीवर आहे. इतर कोणत्याही ऑपरेटरपेक्षा ‘जिओ’ कंपनी ‘एव्हरीडे मोअर व्हॅल्यू’च्या आश्‍वासनानुसार, ग्राहकांना अधिकाधिक फायदे कमी किंमतीत देत आहेत.

अतिरिक्त डेटाचे फायदे १२ जूनला दुपारी चार वाजल्यापासून सुरू होणार असून, ते ३० जूनपर्यंत मिळतील.
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search