Next
शहापूरमध्ये भरणार ‘नाट्यजत्रा’
दत्तात्रय पाटील
Thursday, April 11, 2019 | 04:56 PM
15 0 0
Share this article:

शहापूर : ग्रामीण भागातील कलेला व्यासपीठ मिळावे या हेतूने स्थापन केलेल्या ग्रामीण कला मंचातर्फे ‘नाट्यजत्रा’ या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. १२ एप्रिल २०१९ रोजी प्रकल्पग्रस्त आणि अन्यायग्रस्त शेतकऱ्यांच्या संघर्षाची गोष्ट मांडणाऱ्या वास्तवदर्शी ‘व्हाइट कॉलर’ या दोन अंकी नाटकाचा, तर १३ एप्रिलला समाजातील काही वासनांध वृत्तीचा पर्दाफाश करणाऱ्या ‘गुलाबो’ या नाटकाच्या शुभारंभाचा प्रयोग आयोजित केला आहे.  

ग्रामीण कला मंचातर्फे गेली तीन वर्षे कलाकारांना व्यासपीठ मिळवून देण्याचा प्रयत्न केला जात आहे. ग्रामीण कला मंचने आतापर्यंत अनेक कलाकार घडविले असून, दर वर्षी नवनवीन कलाकार घडविण्याच्या उद्देशाने वेगवेगळ्या कार्यक्रमांचे आयोजन केले जात आहे. या वर्षी ही ग्रामीण कला मंचने रंगभूमीवर ग्रामीण कलाकारांना आपली कला सादर करण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध करून दिले आहे.

शहापूरसारख्या ग्रामीण भागात अनेक गुणी कलाकार आहेत. त्यापैकी बऱ्याच कलाकारांनी व्यावसायिक रंगभूमीवर तसेच टीव्हीवर आपल्या कलेची झलक दाखवली आहे. नाट्यजत्रेत सादर होणाऱ्या दोन्ही नाटकांचा लेखक निर्माता, वेशभूषा, नेपथ्य याची जबाबदारी उमेश भेरे पार पाडत असून,  दिग्दर्शन आणि पार्श्वसंगीत दिग्दर्शक आणि अभिनेता विशाल घनघाव यांनी केले आहे. या दोन्ही नाटकांसाठी अमोघ पेंडसे, भावेश खाडे, चेतन पडवळ यांनी प्रकाश योजनेची जबाबदारी स्वीकारली आहे. रंगभूषा आशुतोष कोचरेकर, नृत्य दिग्दर्शन निकिता ठाकरे यांनी केले आहे.


‘व्हाइट कॉलर’ हे नाटक १२ एप्रिलला सायंकाळी ७.३० वाजता शहापूर-चेरपोली येथील सावंत मैदानावर होईल. या नाटकाला गीतकार डॉ. संजय भोपतराव आणि संगीतकार सुमेध जाधव यांनी गीतबद्ध आहे. नितीन नाडेकर, रेश्मा निमसे, धनेश पाटोले, अरुण चौधरी, किरण कोंगेरे, अनिकेत साळवे, गणेश किरपन, सचिन दवणे, गौरव इंगळे, विवेक वेखंडे, सविता हरड, रितिक सोनावणे हे ग्रामीण कलाकार यात भूमिका साकारत आहेत.

‘गुलाबो’ या नाटकात विशाल घनघाव, आश्रफ शेख, हर्षदा झुंजारराव, विवेक वेखंडे, पूजा अधिकारी, नितीन गाडेकर, माधुरी तारमळे, मयुरी कोंगेरे, गणेश किरपण, दीपाली निचिते, गौरव इंगळे, रितिक सोनावणे, नितीन नाडेकर, मास्टर आदित्य हरड हे कलाकार भूमिका साकारत आहेत. या नाटकांसाठी व्यवस्थापकीय संयोजक म्हणून प्रशांत चौधरी, गणेश किरपण, उमेश विशे, जगदीश भोईर, अजित भालके, संजय गगे, सुनील वेखंडे, दत्ता पाटील, प्रशांत पंडित, राकेश दवे हे जबाबदारी पार पाडत आहेत. नाटककार व दिग्दर्शक चेतन पवार व ह. भ. प. कैलास महाराज निचिते यांचे मार्गदर्शन दोन्ही नाटकांना लाभले आहे. 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search