Next
रत्नागिरीत बचत गट प्रदर्शनाला उत्स्फूर्त प्रतिसाद
BOI
Wednesday, March 13, 2019 | 10:56 AM
15 0 0
Share this story

रत्नागिरी ग्राहक पेठ आणि लायनेस क्लबतर्फे आयोजित बचत गट प्रदर्शन सांगता सोहळ्यात बोलताना प्राची शिंदे.

रत्नागिरी : आंतरराष्ट्रीय महिला दिनाचे औचित्य साधून रत्नागिरी ग्राहक पेठ व लायनेस क्लबच्या रिजन को-ऑर्डिनेटर प्राची शिंदे यांच्या विद्यमाने  आठ ते ११ मार्च २०१९ या कालावधीत शहरातील साई मंगल कार्यालय येथे महिला बचत गटांच्या उत्पादनांचे प्रदर्शन भरविण्यात आले होते. या प्रदर्शनाला रत्नागिरीकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

या प्रदर्शनाचा सांगता सोहळा ११ मार्चला आयोजित करण्यात करण्यात आला होता. या वेळी लायनेस क्लबच्या रिजन को-ऑर्डिनेटर प्राची शिंदे, ‘लायनेस’च्या अध्यक्ष सईदा बाग, सचिव रझिया बाग, खजिनदार शकुंतला झोरे व दीप्ती फडके उद्योजिका उर्मिला घोसाळकर उपस्थित होत्या. चार दिवस चाललेल्या या प्रदर्शनादरम्यान महिलांसाठी विविध कार्यक्रम घेण्यात आले. यामध्ये कॅन्सरविषयी मार्गदर्शन, डोळे तपासणी, रक्तशर्करा तपासणी, ऑनलाइन व्यवहारासाठी इंटरनेटचा वापर, फनी गेम्स, मुद्रा कर्ज योजना व बँकेच्या योजना, खाद्य पदार्थ विक्रीसाठी मार्गदर्शन सत्र यांचा समावेश आहे.

रस्सीखेच स्पर्धेतील विजेत्यांसोबत मान्यवर.

‘या प्रदर्शनाच्यानिमित्ताने नवीन उद्योग सुरू करण्यासाठी प्रेरणा मिळाली; तसेच मैत्रिणीही मिळाल्या’, असे नवउद्योजिका पल्लवी तावडे, चिपळूणच्या नेहा लाड यांनी सांगितले. ‘या प्रदर्शनामुळे आम्हा उद्योजिकांचे एक कुटुंबच तयार झाले असून, इथून पुढे प्राची शिंदे यांनी कोठेही बचत गट प्रदर्शन आयोजित केले की आम्ही त्यात नक्की सहभाग घेऊ,’ अशी प्रतिक्रिया प्राची सावंत यांनी व्यक्त केली. ‘या प्रदर्शनात मी अनेक वर्षे येत असून, प्राची शिंदे यांच्या प्रोत्साहनामुळे आमचा बचत गट हरियाणा, दिल्ली आदी ठिकाणी १२ दिवस सहभागी झाला होता,’ असे स्वाती शिंदे यांनी सांगितले.
 
प्रदर्शनात खरेदीसाठी झालेली गर्दी.या वेळी महिलांसाठी विविध स्पर्धा घेण्यात आल्या होत्या. त्या स्पर्धांचा निकाल असा : पाककला स्पर्धा (रव्याचे तिखट- गोड पदार्थ)- कीर्ती मोडक (पौष्टिक सरप्राइज इडली), नाझिया बाग (पिझ्झा), मनश्री दिवाडकर. पोत्यातून चालणे- पल्लवी तावडे, श्रद्धा तेरेदेसाई. गाढवाला शेपूट लावणे- श्‍वेता यादव. बटाटा रॅली- श्रद्धा कीर, कीर्ती रायकर, स्वाती शिंदे. डबा फोडणे- दीपाली राळेगावकर. रस्सीखेच- विजेता संघ- श्रद्धा कीकर, वैशाली वरू, सोनाली यादव, स्वाती शिंदे, शुभांगी इंदुलकर, अस्मिता पवार, पल्लवी तावडे. उपविजेता संघ- आरती पवार, किर्ती रायकर, श्रद्धा तेरेदेसाई, शिवानी चोरगे, आर्या देवळेकर, आस्मा गोलंदाज, आकांक्षा कीर.
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.
COMMENTS
Bal. gramopadhyep About 8 Days ago
I am sure , there are. Similar groups in. Other. Places . Articles. About them ?
0
0
Shraddha keer About 12 Days ago
4 days mast anubhvle khupch sundar 😊
0
0
प्राची शिंदे About 12 Days ago
अतिशय छान , all the best thanks
0
0

Select Language
Share Link