Next
‘महाराष्ट्र केसरी’साठी पुणे शहर संघाची निवड चाचणी
प्रेस रिलीज
Thursday, December 06 | 03:56 PM
15 0 0
Share this story

पुणे : ‘महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेतर्फे ‘महाराष्ट्र केसरी’ ही मानाची कुस्ती स्पर्धा जालना येथे १९ ते २३ डिसेंबर २०१८ दरम्यान रंगणार आहे. या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी पुणे शहर संघाच्या खेळाडूंची निवड चाचणी १० डिसेंबरला मंगळवार पेठेतील छत्रपती शिवाजी स्टेडियम येथे घेण्यात येणार आहे,’ अशी माहिती राष्ट्रीय तालीम संघाचे सरचिटणीस शिवाजीराव बुचडे यांनी दिली.

निवड चाचणी महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेच्या नियमानुसार, तसेच गादी आणि माती या दोन्ही विभागात होणार आहे. माती विभागात ५७ किलो, ६१ किलो, ६५ किलो, ७० किलो, ७४ किलो, ७९ किलो, ८६ किलो, ९२ किलो, ९७ किलो, ८६ किलो ते १२५ किलो वजनी गटांमध्ये होईल. गादी विभागात ५७ किलो, ६१ किलो, ६५ किलो, ७० किलो, ७४ किलो, ७९ किलो, ८६ किलो, ९२ किलो, ९७ किलो व ८६ किलो ते १२५ किलो अशा वजनी गटांत होईल.

निवड चाचणीत केवळ पुणे शहरातील खेळाडूंचा समावेश असेल. १० डिसेंबरला सकाळी ८.३० ते ११.३० या वेळेत खेळाडूंची वजने केली जाणार असून दुपारी तीन वाजल्यापासून निवड चाचणी स्पर्धेला सुरुवात होईल. निवड चाचणीमध्ये सहभागी होण्यासाठी मल्लांनी तीन फोटो, आधारकार्डची मूळ प्रत व झेरॉक्स घेऊन येणे बंधनकारक आहे. 

अधिक माहितीसाठी खेळाडूंनी राष्ट्रीय तालीम संघाचे सरचिटणीस शिवाजीराव बुचडे, सहसचिव गणेश दांगट, अविनाश टकले, खजिनदार मधुकर फडतरे यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे. 
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link