Next
अमेरिकेत साजरा केला जातो ‘श्रेया घोषाल दिन’
BOI
Tuesday, March 12, 2019 | 05:16 PM
15 0 0
Share this story

श्रेया घोषाल

मुंबई : सुरेल आवाजाचे वरदान लाभलेली सुप्रसिद्ध गायिका श्रेया घोषाल हिचे चाहते केवळ भारतातच नाहीत, तर जगभरात आहेत. विशेष म्हणजे अमेरिकेत तर श्रेयाच्या नावाने एक दिवस साजरा केला जातो. या दिवशी तिथे श्रेयाची गाणी ऐकली जातात. 

भारताबरोबरच जगभरात श्रेयाचे भरपूर चाहते आहेत. आज (१२ मार्च) तिचा वाढदिवसही तिचे जगभरातील चाहते साजरा करत आहेत. परंतु अमेरिकेत मात्र एक वेगळा दिवस हा ‘श्रेया घोषाल दिन’ म्हणून साजरा केला जातो. अमेरिकेतील ओहियो या राज्यात २६ जून हा दिवस तिच्या नावाने साजरा केला जातो. २०१०मध्ये ओहियोतील तत्कालीन राज्यपाल स्टेड स्ट्रीकलँड यांनी या दिनाची घोषणा करून श्रेयाला विशेष सन्मान देऊ केला होता. तेव्हापासून येथील लोक २६ जून हा दिवस श्रेयाची गाणी ऐकून साजरा करतात.

दरम्यान संजय लीला भन्साळी यांच्या ‘देवदास’ चित्रपटातून बॉलीवूडमध्ये आलेली श्रेया त्यानंतर मात्र खूप प्रसिद्धीत आली. त्यानंतर तिने जवळपास २०० चित्रपटांमधून गाणी गायली आहेत. ‘देवदास’ चित्रपटासाठी श्रेयाला राष्ट्रीय पुरस्कार, फिल्मफेअर पुरस्कार, आर. डी. बर्मन पुरस्कार असे अनेक प्रतिष्ठेचे पुरस्कार मिळाले. 

दूर्गापूर येथील बंगाली कुटुंबात जन्मलेल्या श्रेयाने सारेगमप या रिअॅलिटी शो च्या माध्यमातून गाण्यांच्या दुनियेत पाऊल टाकले होते. त्यानंतर मात्र तिने मागे वळून पाहिले नाही. श्रेयाने आजवर मराठी, हिंदी, तेलगू, तमिळ, मल्याळम, बंगाली, असामी अशा अनेक भाषांमधून पार्श्वगायन केले आहे. 
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link