बहुभाषिक सिनेमे गाजवणारी दाक्षिणात्य अभिनेत्री रेवती आणि सहजस्फूर्त अभिनयासाठी गाजलेला बालकलाकार जेडन स्मिथ यांचा आठ जुलै हा जन्मदिन. त्यानिमित्त आजच्या ‘दिनमणी’मध्ये त्यांचा अल्प परिचय... .......
रेवतीआठ जुलै १९६६ रोजी कोचीमध्ये जन्मलेली आशा केलून्नी नायर ऊर्फ रेवती ही बहुभाषिक सिनेमे गाजवणारी दाक्षिणात्य अभिनेत्री. तिने प्रामुख्याने तमिळ (७२), मल्याळम (३१), तेलुगू (१६) आणि हिंदी (१४) सिनेमांतून अभिनय केला आहे. तीन वेळा
राष्ट्रीय पुरस्कार, दोन वेळा
राज्य पुरस्कार, सहा वेळा
फिल्मफेअर पुरस्कार, पाच वेळा सिनेमा एक्स्प्रेस पुरस्कार, एकदा इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल पुरस्कार आणि याव्यतिरिक्त झी, स्क्रीन, विजय आणि फिल्म फॅन्स असोसिएट अशा अनेक पुरस्कारांनी तिच्या अभिनयाचा गौरव करण्यात आला आहे. तिने ‘मित्र, माय फ्रेंड’ या सिनेमाद्वारे दिग्दर्शन क्षेत्रातही पदार्पण केलं आहे.
......
जेडन स्मिथ
आठ जुलै १९९८ रोजी लॉस एंजलीसमध्ये जन्मलेला जेडन स्मिथ हा बालकलाकार म्हणून नावारूपाला आलेला अभिनेता. ‘ऑल ऑफ अस’ या टीव्ही सीरियलमधून त्याने अभिनयाला सुरुवात केली होती. आपल्या पित्याबरोबर (विल स्मिथ) त्याने ‘
पर्स्युट ऑफ हॅपिनेस’या रूपेरी पडद्यावरच्या पदार्पणातच आपल्या अतिशय सहजसुंदर अभिनयाने छाप पाडली होती. त्यासाठी त्याला २००७ सालचं एमटीव्ही मूव्ही ब्रेकथ्रू परफॉर्मन्स अॅवॉर्ड मिळालं होतं. किआनु रिव्हजबरोबर त्याने २००८ साली ‘
दी डे दी अर्थ स्टूड स्टील’ या सिनेमातून आपली अभिनयाची दखल घ्यायला लावली आणि सॅटर्न अॅवॉर्ड मिळवलं. पाठोपाठ २०१० साली आलेल्या ‘
कराटे किड’मधून त्याने जॅकी चॅनबरोबर जबरदस्त परफॉर्मन्स दिला आणि ब्लॅक एंटरटेन्मेंट अॅवॉर्ड मिळवलं. २०१३ साली तो पुन्हा आपल्या वडिलांबरोबर (विल स्मिथ) ‘आफ्टर अर्थ’ या सिनेमातून चमकला. तो स्वतंत्रपणे गाणी लिहून गाण्याचे अल्बमही काढत असतो.
यांचाही आज जन्मदिन :
कादंबरीकार गो. नी. दांडेकर : आठ जुलै १९१६ – एक जून १९१६
गो. नी. दांडेकर यांची पुस्तकं ‘बुकगंगा डॉट कॉम’वरून घरपोच मागवण्यासाठी
येथे क्लिक करा.
(दररोज प्रसिद्ध होणाऱ्या ‘दिनमणी’ सदरातले स्फुट लेख एकत्रितरीत्या https://goo.gl/QMr7oP या लिंकवर वाचता येतील.)