Next
शहरातील बालमजुरी रोखण्यासाठी पुणे महापालिका कटिबद्ध : उपमहापौर
BOI
Saturday, June 15, 2019 | 01:40 PM
15 0 0
Share this article:

पुणे : 'शहरातील बालमजुरी रोखण्यासाठी पुणे महानगरपालिका कटिबद्ध असून वंचित घटकांतील सर्व मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी पालिकेतर्फे प्रयत्न करण्यात येतील', असे आश्वासन पुण्याचे उपमहापौर डॉ. सिद्धार्थ धेंडे यांनी दिले.'जागतिक बालमजुरी विरोध' दिनानिमित्त पुणे महापालिका आणि बालहक्क कृती समिती यांच्या संयुक्त विद्यमाने घेण्यात आलेल्या ‘बालमजुरी विरोधात बाल जनमत’ या कार्यक्रमात डॉ. धेंडे बोलत होते.

 
या वेळी माध्यमिक शिक्षण विभागाचे प्रशासकीय अधिकारी दीपक माळी, कामगार अधिकारी नितीन केंजळे, सहायक प्रशासकीय अधिकारी शरद यादव, माणिक देवकर, सचिन काळे, बाल हक्क कृती समितीचे निमंत्रक मनीष श्रॉफ आणि संस्थेतील कर्मचारी व पदाधिकारी उपस्थित होते. 


'आमच्या वस्तीमधील अनेक मुले बालमजुरी करतात. वस्तीमध्ये हातभट्टीचा अड्डा आहे तिथेसुद्धा लहान मुले काम करतात. आमच्या शाळेत शौचालये नाहीत. शाळेतील पोषण आहारात किडे आढळतात. हे सर्व ठीक करण्यासाठी तुम्ही काय उपाययोजना करणार', असा सवाल या वेळी विद्यार्थ्यांनी उपमहापौरांकडे केला. विचारलेल्या प्रश्नांची दखल घेत उपमहापौरांनी संबंधित अधिकाऱ्यांना याचा पाठपुरावा करण्याचे आदेश दिले.
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search