Next
खरा संभाजी
BOI
Wednesday, January 09 | 10:04 AM
15 0 0
Share this story

छत्रपती शिवाजी महाराज यांचे पुत्र संभाजी महाराज यांचे जीवन अनेक घटनांनी भारलेले आहे. शंभू महाराजांना लहानपणापासून युद्धकलेचे धडे मिळालेच, शिवाय शत्रूला  कसे खेळवायचे, नामोहरम करायचे हेही ते शिकले. स्वराज्यासाठी त्यांनी प्राणार्पणही केले. स्वराज्याचा छावा असलेल्या संभाजी राजांचे चरित्र प्रा. नामदेवराव जाधव यांनी ‘खरा संभाजी’मधून कथन केले आहे.

प्रथम युवराज संभाजी यांचा परिचय करून देत औरंगजेब व संभाजी महाराज यांची तुलना, औरंगजेबापेक्षा लष्करी व आर्थिक ताकद कमी असतानाही दिलेला लढा, औरंगजेबाचा मुलगा अकबर व संभाजी यांचे संबंध, संभाजी महाराजांना अडचणीत आणण्यासाठी अष्टप्रधानांनी केलेली कारस्थाने व ती असफल ठरविण्यासाठी शंभूराजांनी दाखविलेली मुत्सद्देगिरी, दूरदृष्टी याची प्रचिती यातून येते.

शिवाजी महाराजांच्या रणनीतीनुसार शंभूराजे दिलेर खानला जाऊन मिळाल्यानंतरचे प्रसंग, दिलेर खानच्या तावडीतून सुटका केल्यानंतर पन्हाळगडावर राजांसोबतच्या चर्चा, राज्यांच्या मृत्यूनंतर त्यांचा राज्याभिषेक व त्यानंतर स्वराज्य राखण्यासाठी, रयतेच्या सुखासाठी केलेल्या उपाययोजना, नाविन्यपूर्ण प्रकल्प याची माहिती समजते.

पुस्तक : खरा संभाजी
लेखक : प्रा. नामदेवराव जाधव
प्रकाशक : राजमाता प्रकाशन
पाने : २०६
किंमत : २२० रुपये

(हे पुस्तक ‘बुकगंगा डॉट कॉम’वरून घरपोच मागवण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.)

 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link