Next
वेदपाठशाळेच्या इमारतीसाठी दिला १० लाखांचा निधी
गंगाखेडमधील कृष्ण यजुर्वेद वेदपाठशाळेचा वर्धापनदिन उत्साहात साजरा
प्रेस रिलीज
Friday, September 14 | 05:05 PM
15 0 0
Share this story

पुणे : येथील वेदाचार्य घैसास गुरूजी वेदपाठशाळाद्वारा संचलित कै. लक्ष्मणराव गुरूजी सेवाभावी संस्था यांच्या सहकार्याने परभणी जिल्ह्यातील गंगाखेड येथे सुरू झालेल्या श्री धुंडेश्वरी देवी कृष्ण यजुर्वेद पाठशाळेचा पहिला वर्धापनदिन नुकताच संपन्न झाला. या वेळी स्थानिक आमदार डॉ. मधुसूदन केंद्रे यांनी वेदपाठशाळेच्या अपूर्ण इमारतीसाठी आमदार निधीतून १० लाख रुपये देणगी देण्याची घोषणा केली. 

सात दिवस चाललेल्या या कार्यक्रमात विविध उपक्रमांची आणि कार्यक्रमांची रेलचेल होती. यानिमित्ताने महायज्ञाचे आयोजन करण्यात आले होते.  ‘वेदातील विविध सुक्ते व त्यांचे अर्थ’, ‘गुरूमहिमा व दैनंदिन जीवनातील वेदांचे महत्त्व’ अशा विषयांवर मान्यवरांची व्याख्याने आयोजित करण्यात आली होती. मोरेश्वर घेसास, धनंजय कार्लेकर, वसंतबुवा मंडलिक, विश्वास घोडसकर, यशोधन किसन महाराज साखरे, भक्ती राठी, यज्ञेश्वर लिंबेकर यांसारख्या वक्त्यांनी यात व्याख्याने दिली. गंगाखेडचे स्थानिक आमदार मधूसूदन केंद्रे यांची या कार्यक्रमाला उपस्थिती होती. 

या वेळी वेदभवनचे प्रधानाचार्य मोरेश्वर घैसास यांनी पुण्यातील वेदभवनच्या कार्याविषयी व गंगाखेड येथील पाठशाळा सुरू करण्याविषयी माहिती दिली. मधुसूदन केंद्रे यांनी गंगाखेडमध्ये ही पाठशाळा सुरू केल्याबद्दल वेदभवनचे आभार मानले. ‘वेदांचे अध्ययन केलेल्यांची गरज आजही समाजाला असून, जेव्हा मानसिक धैर्य कमी होते, तेव्हा त्याला कर्मकांडातून मानसिक धैर्य मिळते व हे कर्म जर चांगल्या, शुद्ध मंत्रोच्चाराने केले, तर त्यातून मनाला आनंदच मिळेल’, असे मत या वेळी त्यांनी मांडले. याबरोबरच वेदशाळेच्या अपूर्ण असलेल्या इमारतीसाठी केंद्रे यांनी त्यांच्या आमदार निधीतून १० लाख देण्याचे कबूल केले आहे. 
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link