Next
अधिकाऱ्यांनी अलर्ट राहण्याचे आयुक्तांचे आदेश
प्रेस रिलीज
Thursday, August 31, 2017 | 03:16 PM
15 0 0
Share this article:

ठाणे : सुरू असलेल्या संततधार पर्जन्यवृष्टीच्या पार्श्वभूमीवर महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक घेऊन सर्वांना अलर्ट राहण्याचे आदेश दिले आहेत.

दरम्यान ज्या ज्या ठिकाणी पाणी साचले होते, त्या सर्व ठिकाणी औषध फवारणी करण्याचे आदेश वैद्यकीय आरोग्य अधिकाऱ्यांना देतानाच शहरात साथीचे आजार उद्भवू नयेत. यासाठी सर्व प्रभाग समितीतंर्गत आरोग्य शिबिरांचे आयोजन करण्याच्या सूचना दिल्या. त्याचबरोबर ज्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाण्याचा निचरा न झाल्याने रॅबीट किंवा माती साचली आहे त्या सर्व ठिकाणांची तातडीने अग्निशमन दलाच्या मशीनच्या सहाय्याने साफसफाई करावी असेही  जयस्वाल यांनी घनकचरा विभागाच्या अधिकाऱ्यांना सूचित केले.

ज्या ठिकाणाहून दुषित पाण्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या होत्या त्या ठिकाणच्या नळ संयोजनांची तपासणी करून आवश्यक ती कारवाई करण्याच्या सूचनाही त्यांनी या बैठकीत पाणी पुरवठा अधिकाऱ्यांना दिल्या. त्याचप्रमाणे शहरातील विद्युत पोलची तपासणी करून प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्याच्या सूचना त्यांनी विद्युत विभागाला दिल्या.

या वेळी जयस्वाल यांनी नगर अभियंता यांना शहरातील खड्डे बुजविण्यासंदर्भात तातडीने कार्यवाही करण्याचे आदेश दिले.
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search