Next
‘कोकणातल्या माणसांकडे गुणग्राहकता’
भुईरिंगण पुस्तकाचे रत्नागिरीत प्रकाशन
BOI
Saturday, July 28, 2018 | 03:05 PM
15 0 0
Share this article:

‘भुईरिंगण’ पुस्तक आणि ई-बुकचे प्रकाशन करताना (डावीकडून) विनोद वायंगणकर, नमिता कीर, डॉ. अलिमियाँ परकार, पुस्तकाच्या लेखिका रश्मी कशेळकर, अनिल विभुते, डॉ. दिलीप पाखरे, अनिकेत कोनकर

रत्नागिरी :
‘रत्नागिरी आणि कोकणातल्या माणसांकडे गुणग्राहकता आहे. ‘भुईरिंगण’ या पुस्तकाला नंतर अनेक पुरस्कार मिळाले; मात्र पुस्तक प्रकाशित झाल्यानंतर रत्नागिरीकरांच्या वतीने संकल्प कला मंचाने माझा गौरव केला होता, तो मी कधीच विसरणार नाही. म्हणूनच या पुस्तकाची दुसरी आवृत्ती आज संकल्प कला मंचाच्याच कार्यक्रमात प्रकाशित होत असल्याचा आनंद वेगळा आहे,’ अशा भावना लेखिका रश्मी कशेळकर यांनी व्यक्त केल्या. 

मनोगत व्यक्त करताना लेखिका रश्मी कशेळकरकशेळकर यांनी लिहिलेल्या ‘भुईरिंगण’ या पुस्तकाच्या दुसऱ्या आवृत्तीचे प्रकाशन गुरुपौर्णिमेच्या दिवशी (२७ जुलै २०१८) रत्नागिरीतील संकल्प कला मंचाने आयोजित केलेल्या गुणगौरव समारंभात झाले. त्या वेळी त्या बोलत होत्या. कोकण मराठी साहित्य परिषदेच्या कार्याध्यक्षा आणि ज्येष्ठ पत्रकार नमिता कीर, रत्नागिरीतील ज्येष्ठ वैद्यकतज्ज्ञ डॉ. अलिमियाँ परकार, रत्नागिरी पोलिसांच्या वाहतूक शाखेचे निरीक्षक अनिल विभुते, संकल्प कला मंचाचे अध्यक्ष विनोद वायंगणकर, सल्लागार डॉ. दिलीप पाखरे या मान्यवरांच्या हस्ते या पुस्तकाचे प्रकाशन झाले. 

सुरंगी प्रकाशनाने या पुस्तकाची दुसरी आवृत्ती प्रकाशित केली आहे. ‘बुकगंगा डॉट कॉम’ने या पुस्तकाचे ई-बुकही प्रकाशित केले असून, त्याचेही प्रकाशन या वेळी झाले. बुकगंगा परिवारातील ‘बाइट्स ऑफ इंडिया’ या पॉझिटिव्ह मीडिया पोर्टलचे संपादक अनिकेत कोनकर यांनी या वेळी ‘बुकगंगा’च्या कार्याबद्दल माहिती दिली. 

‘भुईरिंगण’ हे ललित गद्य स्वरूपातील लेखांचे पुस्तक असून, विविध दिवाळी अंकांत कशेळकर यांनी लिहिलेल्या लेखांचे संकलन त्यात करण्यात आले आहे. निसर्गरम्य कोकणाच्या पार्श्वभूमीवरच्या या पुस्तकाला वाचकांची पसंती तर मिळालीच; पण महाराष्ट्र शासनाचा २०१६च्या स्व. यशवंतराव चव्हाण राज्य वाङ्मय पुरस्कारांमधील ताराबाई शिंदे पुरस्कारही त्याला मिळाला आहे. तसेच अन्य अनेक राज्यस्तरीय पुरस्कारही या पुस्तकाला मिळाले आहेत. 

(संकल्प कला मंचाच्या गुणगौरव कार्यक्रमाची सविस्तर बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा. ‘भुईरिंगण’ हे पुस्तक ‘बुकगंगा डॉट कॉम’वरून घरपोच मागविण्यासाठी किंवा त्याचे ‘ई-बुक’ खरेदी करण्यासाठी https://www.bookganga.com/R/7UV6W या लिंकवर क्लिक करा.)
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.
COMMENTS
Bal Gramopadhye About 189 Days ago
How many copies have been sold ? it would be interesting to know .
0
0

Select Language
Share Link
 
Search