Next
महिला वैमानिकांच्या चमूने केले लढाऊ हेलिकॉप्टरचे यशस्वी उड्डाण
हवाई दलात महिलांची आणखी एक ऐतिहासिक कामगिरी
BOI
Tuesday, May 28, 2019 | 03:27 PM
15 0 0
Share this article:

लढाऊ हेलिकॉप्टर ‘एमआय १७ व्ही ५’चे यशस्वी उड्डाण करणारा महिला वैमानिकांचा गट (डावीकडून) फ्लाइट लेफ्टनंट पारुल भारद्वाज, फ्लाइंग ऑफिसर अमन निधी (सहवैमानिक), फ्लाइट लेफ्टनंट हीना जैस्वाल आणि स्क्वाड्रन लीडर रिचा अधिकारी.

चंडीगड : फ्लाइट लेफ्टनंट भावना कांत हिने पहिली महिला युद्ध वैमानिक होण्याचा मान नुकताच पटकावला. त्यापाठोपाठ भारतीय हवाई दलातील तीन महिला वैमानिकांनी एक ऐतिहासिक कामगिरी केली आहे. मध्यम क्षमतेचे ‘एमआय १७ व्ही ५’ हे लढाऊ हेलिकॉप्टर या महिला वैमानिकांच्या चमूने यशस्वीरीत्या उडविले. संपूर्णपणे महिला चमूने हे हेलिकॉप्टर उडविण्याची ही पहिलीच वेळ आहे.

फ्लाइट लेफ्टनंट पारुल भारद्वाज यांच्या नेतृत्वाखाली फ्लाइंग ऑफिसर अमन निधी (सहवैमानिक), फ्लाइट लेफ्टनंट हीना जैस्वाल (फ्लाइट इंजिनीअर) यांनी ‘एमआय १७ व्ही ५’ हे युद्धासाठी वापरले जाणारे हेलिकॉप्टर यशस्वीपणे चालवले. स्क्वाड्रन लीडर रिचा अधिकारी यांनी अभियांत्रिकी अधिकारी म्हणून काम पाहिले. त्यांनी हे हेलिकॉप्टर चालवण्यास योग्य असल्याची तपासणी केली व प्रमाणपत्र दिले.  


फ्लाइट लेफ्टनंट पारुल भारद्वाज या ‘एमआय १७ व्ही ५’ हे हेलिकॉप्टर चालवणाऱ्या पहिल्या महिला वैमानिक ठरल्या असून, त्या पंजाबमधील मुकेरीयन प्रांतातील आहेत. अमन निधी या रांचीच्या असून, त्या भारतीय हवाई दलातील झारखंडमधील पहिल्या महिला वैमानिक ठरल्या आहेत. चंडीगडच्या हीना जैस्वाल या हवाई दल इंजिनीअर असलेल्या पहिल्या महिला आहेत. 


या सर्वांनी विमान चालवण्याचे प्राथमिक प्रशिक्षण हकीमपेठ येथील हेलिकॉप्टर प्रशिक्षण स्कूलमधून पूर्ण केले असून, त्यानंतरचे अद्ययावत प्रशिक्षण हवाई दलाच्या येलहांका येथील तळावर पूर्ण केले आहे. 

भारतीय हवाई दलाच्या महिला वैमानिकांनी एक ऐतिहासिक कामगिरी केली असल्याचे हवाई दलाने म्हटले आहे. महिला वैमानिकांनी केलेल्या या कामगिरीबद्दल सर्वत्र त्यांचे अभिनंदन आणि कौतुक होत आहे. भारतीय महिलांसमोर, विशेषतः नवीन पिढीसमोर त्यांनी एक नवा आदर्श निर्माण केला आहे. 

(पहिली भारतीय लढाऊ वैमानिक भावना कांत यांच्याविषयी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

(पहिली महिला फ्लाइट इंजिनीअर हीना जैस्वाल यांच्याविषयी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)   
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search