Next
वो जब याद आये
BOI
Thursday, March 07, 2019 | 10:38 AM
15 0 0
Share this story

हिंदी चित्रपटात पार्श्वगायनाला १९३५मध्ये सुरुवात झाली. ज्यांना गाणे म्हणता येत असे ते त्या वेळी चित्रपटाचे नायक-नायिका असत. त्या वेळी के. एल. सैगल हे नायक व गायक म्हणून लोकप्रिय झाले. नूरजहाँ, सुरय्या यांनीही दोन्ही आघाड्या सांभाळल्या. पुढे किशोर कुमार यात यशस्वी ठरले. त्या काळातील गायकांचा परिचय अशोक उजळंबकर यांनी ‘वो जब याद आये’ म्हणून करून दिला आहे.

पार्श्वगायनाची कथा, पार्श्वगायकाची परंपरा आधी सांगून प्रथम परिचय अर्थात कुंदनलाल सैगल यांचा येतो. पुढे पंकज मलिक, जी. एम. दुराणी, सुरेंद्र, नूरजहाँ, शमशाद बेगम, सुरय्या, जगजीत कौर, तलत महमूद, महंमद रफी, मुकेश, लता मंगेशकर, अशा भोसले, गीता दत्त, मन्ना डे, सुमन कल्याणपूर, किशोर कुमार आदी २६ गायक-गायिकांची ओळख व सोबत त्यांच्या गाजलेल्या गाण्यांची यादी दिली आहे; तसेच के. सी. डे, खुर्शीद, काननदेवी, अमीरादेवी कर्नाटकी, जोहराबाई अंबालेवाली, शांता आपटे आदींचा परिचयही यात करून दिला आहे.     
      
पुस्तक : वो जब याद आये
लेखक : अशोक उजळंबकर
प्रकाशक : अजिंक्य प्रकाशन
पाने : २४७
किंमत : २५० रुपये

(हे पुस्तक ‘बुकगंगा डॉट कॉम’वरून घरपोच मागवण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.)

 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link