Next
अग्निशमन सेवा सप्ताहादरम्यान पुण्यात जनजागृती उपक्रम
प्रेस रिलीज
Tuesday, April 23, 2019 | 05:01 PM
15 0 0
Share this article:


पुणे : राष्ट्रीय अग्निशमन सेवा सप्ताहानिमित्त सेफ किड्स् फाउंडेशन इंडिया, हनीवेल इंडिया आणि पुणे अग्निशमन विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने अग्निसुरक्षा जनजागृती उपक्रमाचे आयोजन केले होते. या उपक्रमात आठ हजार ५०० लहान मुले आणि ९० हजार ७०० पालक आणि एकूणच ११ लाख ६२ हजार २५० लोकांनी यात सहभागी होत, विविध अग्नी सुरक्षा प्रक्रिया व प्रतिबंधात्मक उपायांबद्दल माहिती घेतली.

या अग्निशमन सेवा सप्ताहासाठी हनीवेल प्रायोजित असलेल्या सेफ किडस् अ‍ॅट होम-सेफ किड्स् फाउंडेशनचा होम सेफ्टी प्रोग्रामचे आधुनिक, अनुभवात्मक आणि रंजक शैक्षणिक साधनांद्वारे अग्नी सुरक्षा जनजागृती करून विविध वयोगटापर्यंत पोहचण्याचे उद्दिष्ट आहे. पुण्यातील आगीच्या घटना कमी करण्यासाठी व भाजण्याच्या घटना रोखण्यासाठी आणि मुलांचे जीवन वाचविण्यासाठी अशा प्रकारचे अग्नीसुरक्षा कार्यक्रम आयोजित करण्यात येतात.

सेवा करताना आयुष्य गमाविलेल्या अग्निशमन अधिकार्‍यांच्या स्मरणार्थ हा सप्ताह राष्ट्रीय स्तरावर साजरा केला जातो. या सप्ताहादरम्यान अग्निशमन यंत्रांचे प्रदर्शन, सेफ किडस फाउंडेशन बुथचे उद्घाटन, रोड शोज, किड्स कार्निव्हल, शालेय प्रभात फेरी, रांगोळी स्पर्धा, शाळा, हॉस्पिटल्स, हाउसिंग सोसायटीमध्ये अग्निशमन प्रात्यक्षिके आणि सेफ किड्स फाउंडेशनने सजविलेल्या वाहनाद्वारे शहरातील जागरूकता अभियानाचे आयोजन करण्यात आले होते.


१९ फायर ब्रिगेडससोबत रोड शो हे या वर्षीच्या उपक्रमाचे मुख्य आकर्षण होते. याबरोबर २० एप्रिल रोजी अग्निशमन दलाच्या केंद्रीय मध्यवर्ती कार्यालयात झालेल्या सप्ताहाच्या समारोपात पुणे अग्निशमन विभागाने २०० स्वयंसेवकांची ओळखपत्र देऊन अग्निसुरक्षा मित्र म्हणून औपचारिकरित्या समाविष्ट करून घेण्यात आले.

या वेळी बोलताना पुणे अग्निशमन दलाचे मुख्य अग्निशमन अधिकारी प्रशांत रणपिसे म्हणाले, ‘अग्नी हा जीवनदाता आहे, तसेच तो प्राणघातकही आहे. तो आपल्याला जगण्यासाठी आवश्यक सर्वकाही देतो; तसेच तो आपले आयुष्य उध्वस्तही करू शकतो. आपल्या आजच्या अग्निशमन दलाचे जवान आगीशी झुंज देण्यासाठी आपले प्राण पणाला लावतात. अग्निप्रतिबंधक उपाययोजनांसाठी केलेल्या जनजागृतीचा परिणाम म्हणून अग्निशमन दलाला येणार्‍या फोन्समध्ये ५० टक्क्यांपेक्षा अधिक घट झाली आहे आणि अग्निप्रतिबंधक उपाययोजनांना पाठिंबा देण्यासाठी प्रतिज्ञा घेण्यासाठी पुढे येणार्‍या युवकांची संख्या दिवसेंदिवस अधिकच वाढत आहे.’ 

‘भारतात प्रथमच २०० स्वयंसेवकांनी अग्निसुरक्षा मित्र म्हणून पुण्यातील अग्निशमन दलाशी अधिकृतपणे नावनोंदणी केली आहे. पुण्याला एक सुरक्षित शहर बनवण्यासाठी अग्निप्रतिबंधक उपायांबाबत जास्तीत जास्त नागरिकांना अधिक जागरूक करणे आवश्यक आहे. केवळ अग्निसंबंधी दुर्लक्ष व उपाययोजनांची माहिती नसणे ही अनेक जीवीतहानी आणि मालमत्तेच्या हानीसाठी कारणीभूत ठरता कामा नये,’ असे रणपिसे यांनी सांगितले.

सेफ किड्स फाउंडेशन इंडियाच्या कार्यक्रम संचालिका डॉ. सिंथिया पिंटो म्हणाल्या, ‘गेली चार वर्षे पुण्यात अग्नी सुरक्षेच्या जागृतीबाबत आम्ही अविरत प्रयत्न करीत आहोत आणि आजवर २५० वसाहतींमधून चार लाख २५ हजार पालक आणि एक हजार १५० शाळांमधून पाच लाख विद्यार्थ्यांपर्यंत आम्ही पोहोचलो आहे. आठवडाभर चाललेल्या जनजागृती मोहिमेच्या उपक्रमाची संकल्पना ही संपूर्ण शहरात आग विझविण्यापेक्षा, आग प्रतिबंध उपाययोजना अशी होती आणि याद्वारे आग प्रतिबंधात्मक उपाय पाळण्यासाठी सगळ्या पुणेकर नागरिकांना आम्ही आव्हान केले. हे आग प्रतिबंधात्मक उपाय आणि आपत्कालीन काळातील संपर्क क्रमांक बाबत बहुतेक  पालक, नागरिक व विद्यार्थी परिचित झाले असून, ही प्रोत्साहित करणारी बाब आहे.’
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search