Next
‘मिशन फाइट ओबेसिटी’साठी विविध उपक्रम
प्रेस रिलीज
Wednesday, March 13, 2019 | 04:50 PM
15 0 0
Share this article:पुणे : सह्याद्री हॉस्पिटल, जेटीज ओबेसीटी सोल्युशन्स आणि रोटरी क्लब कोरेगाव पार्क यांच्या संयुक्त विद्यमाने मिशन फाइट ओबेसिटी अधिक व्यापक करण्याच्या दृष्टीने अनेक उपक्रम सुरू करण्यात आले आहेत. एस. एम जोशी हॉल येथे आयोजित चर्चासत्रात याची घोषणा करण्यात आली.

या प्रसंगी ‘आयएमए’चे महाराष्ट्रातील अध्यक्ष डॉ. अविनाश भोंडवे, ‘आयएमए’ पुणे शाखेच्या अध्यक्ष डॉ. पद्मा अय्यर, सह्याद्री हॉस्पिटल्सच्या लाप्रोस्कोपीक आणि बेरियट्रिक सर्जन डॉ. जयश्री तोडकर, ‘सह्याद्री’चे युनिट प्रमुख डॉ. केतन आपटे, रोटरी क्लब कोरेगाव पार्कचे अध्यक्ष महेश शहा, मुकुल माधव फाउंडेशनच्या अध्यक्ष रितू छाब्रिया आदी मान्यवर उपस्थित होते. नवीन उपक्रमांमध्ये प्रौढांसाठी स्टेपेथॉन चॅलेंज आणि शालेय विद्यार्थ्यांसाठी कलेच्या माध्यमातून आरोग्याचा प्रसार याचा समावेश आहे.

इंडियन डायटेटीक्स असोसिएशन, इंडियन मेडिकल असोसिएशन, इंडियन मेडिकल सोसायटी, सिंबायोसिस इन्स्टिट्यूट, मुकुल माधव फाउंडेशन, जे टी फाउंडेशन , रोटरी क्लब यांसारख्या अनेक नामवंत संस्था या जागृती उपक्रमात सहभागी झाल्या आहेत.

या वेळी बोलताना डॉ. जयश्री तोडकर म्हणाल्या, ‘‘स्टेपेथॉन २०१९’ हा एक अद्वितीय उपक्रम असून, आपला समाज आरोग्यदायी व लठ्ठपणा मुक्त व्हावा या दिशेने एक ठोस पाऊल आहे. हा उपक्रम एप्रिल २०१९ ते ऑगस्ट २०१९ दरम्यान आयोजित केला गेला असून, यामध्ये पाच हजार लोक सहभागी होतील अशी अपेक्षा आहे. हा तीन महिने चालणारा उपक्रम आहे. यात नावनोंदणीनंतर आपल्या आरोग्याचे मूल्यांकन करण्यासाठी सह्याद्री हॉस्पिटलमध्ये प्राथमिक चाचण्या केल्या जातील.’‘या उपक्रमामध्ये तयार केलेल्या हेल्थ मॉडेल्सअंतर्गत प्रत्येक शनिवारी तज्ज्ञांमार्फत मार्गदर्शन केले जाईल. एका विशेष हेल्थ डायरीमुळे स्टेपेथॉनमधील आपल्या प्रवासावर देखरेख ठेवता येईल. त्याशिवाय मोबाइलमधून डाउनलोड केलेल्या हेल्थ ॲपमुळे आपण रोज किती पावले टाकत आहोत याचे मोजमाप करता येईल. या उपक्रमाची सांगता ऑगस्टमध्ये स्टेपेथॉन वॉकने होईल,’ अशी माहिती डॉ. तोडकर यांनी दिली.

‘दुसरा उपक्रम हा शालेय असून जुलै २०१९मध्ये सुरू होईल व यामध्ये कलेच्या माध्यमातून लठ्ठपणाबाबत जागृती केली जाईल. १५ ऑगस्ट ते १४ नोव्हेंबर २०१९ दरम्यान सुरू राहणार आहे. हा उपक्रम चित्रकला स्पर्धेच्या स्वरूपात असणार आहे. या वर्षी आम्ही १४ लाख विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. या शिवाय पुणे जिल्ह्यात एक हजाराहून अधिक शाळांमध्ये लठ्ठपणाबाबत चाचण्या, माहिती देणाऱ्या साहित्याचे वितरण व लठ्ठपणाबाबत जागृती निर्माण करण्यासाठी शिक्षक व पालकांची संवाद अशा अनेक उपक्रमांचाही समावेश असेल,’ असे डॉ. तोडकर यांनी सांगितले.

आम्ही सह्याद्री हॉस्पिटलमध्ये चाइल्डहूड ओबेसिटी क्लिनिक सुरू केले आहे. त्याच्या माध्यमातून १५पेक्षा कमी वयोगटातील मुलांना लठ्ठपणाबाबत दर शनिवारी मोफत मार्गदर्शन केले जाते. या सर्व उपक्रमांचा मूळ हेतू हा लहानपणापासून मुलांमध्ये आरोग्याशी निगडित चांगल्या सवयी निर्माण होण्यासाठी असल्याचे त्या म्हणाल्या.

‘आयएमए’च्या महाराष्ट्र शाखेचे अध्यक्ष डॉ. अविनाश भोंडवे म्हणाले, ‘लहान मुलांमधील लठ्ठपणा व कुपोषण या दोन्हींची संख्या दुर्दैवाने भारतात जास्त आहे. याच्याविरुद्ध आपण लढा उभा केला पाहिजे. ‘आयएमए’चे महाराष्ट्रात ४३ हजारांहून अधिक सदस्य आहेत आणि त्यांच्याद्वारे महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात हा उपक्रम आम्ही नेण्याचा प्रयत्न करू.’

दोन वर्षांपूर्वी सुरू झालेल्या ‘मिशन फाइट ओबेसिटी’ या उपक्रमाबाबत बोलताना डॉ. तोडकर म्हणाल्या, ‘ओबेसिटी टास्क फोर्सअंतर्गत आम्ही अनेक उपक्रम घेतले. त्यामध्ये शालेय पातळीवरचे उपक्रम डॉक्टरांसाठी फेलोशिप प्रोग्रॅम, ओबेसिटी ओपीडी सरकारी आरोग्य शिबिरात लठ्ठपणा चाचण्या, विविध हॉस्पिटल्समध्ये ओबेसिटी ओपीडी व लठ्ठपणाबाबत सर्वेक्षण यांचा समावेश आहे. स्मार्ट सिटी न्यूट्रिशन प्रोग्रामअंतर्गत शालेय अभ्यासक्रमात आरोग्यदायी सवयींचा समावेश करण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत.’
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search