Next
रोटरी क्लब प्रिस्टिन ट्रान्सफॉर्मेशन अॅवॉर्ड्सचे वितरण
प्रेस रिलीज
Monday, April 01, 2019 | 01:07 PM
15 0 0
Share this article:पुणे : समाजातील सकारात्मक परिवर्तनासाठी झटणाऱ्या संस्थांचा गुणगौरव करणाऱ्या रोटरी क्लब ऑफ पुणे प्रिस्टिन ट्रान्सफॉर्मेशन अॅवॉर्ड्सचे वितरण ३० मार्च २०१९ रोजी विशेष सोहळ्यात करण्यात आले.

रोटरी क्लब ऑफ पुणे प्रिस्टिनचे अध्यक्ष संजय बडवे, सचिव राहुल कडगे, संचालक माणिक नाईक, निमंत्रक अंजली मेहंदळे उपस्थित होते. हा कार्यक्रम पुणे पत्रकार संघ  सभागृह येथे झाला.

वैद्यकीय क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाबद्दल केअर एनएक्स (CareNX), मूलभूत शिक्षण आणि साक्षरतेमधील योगदानाबद्दल ग्राममंगल संस्था, आर्थिक-समाजविकसनातील योगदानाबद्दल ज्ञानप्रबोधिनी संस्थेला,  तसेच कला क्षेत्रातील योगदानाबद्दल महाराष्ट्र कलोपासक संस्थेला या कार्यक्रमात गौरविण्यात आले.

‘रोटरी’चे माजी प्रांतपाल मोहन पालेशा यांच्या हस्ते हे पुरस्कार वितरीत करण्यात आले. ‘केअर एनएक्स’चे शिरीष वसू, आदित्य कुलकर्णी, ‘ज्ञानप्रबोधिनी’च्या सुवर्णा गोखले, पूर्वा देशमुख, मनिषा शेटे, ‘ग्राममंगल’च्या आदिती नातुरे, सुषमा पाध्ये, ‘महाराष्ट्र कलोपासक’चे राजन ठाकूरदेसाई, अनंत निघोजकर यांनी सन्मान स्वीकारला.

या प्रसंगी बोलताना मोहन पालेशा म्हणाले, ‘समाजात सुशिक्षितांमधे तरलता हरवत चालली आहे. जाणीवा बोथट होत चालल्याने या संवेदना तरल राहणे हीच आजची गरज आहे. नाविन्यपूर्ण काम हाती घ्यायला खूप हिंमत लागते, जी आजच्या पुरस्कारार्थींमधे दिसते. स्वतः पलीकडे समाजहिताचा विचार करणे हीच मूल्ये आपण स्वत:मधे मुरवली पाहिजे, तरच जगातील सर्व समस्या मिटतील.’

अंजली मेहेंदळे यांनी प्रास्ताविक केले. सुदीन आपटे, संदीप बेलवलकर, सिद्धी कुलकर्णी यांनी सूत्रसंचालन केले. नितीन मुळे यांनी आभार मानले.
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search