Next
‘जेट एअरवेज’च्या पुणे-सिंगापूर सेवेला सुरुवात
प्रेस रिलीज
Tuesday, December 04, 2018 | 05:20 PM
15 0 0
Share this article:

जेट एअरवेजच्या पुणे-सिंगापूर विमानसेवेचा दीपप्रज्वलन करून उद्घाटन करताना कार्यकारी अधिकारी विनय दुबे. शेजारी खासदार अनिल शिरोळे, राज्यसभेचे खासदार संभाजीराजे छत्रपती, नागरी विमान वाहतूक सचिव वलसा नायर सिंग आदी मान्यवर.पुणे : जेट एअरवेज या आंतरराष्ट्रीय विमान कंपनीने एक डिसेंबर २०१८पासून पुणे व सिंगापूर या दरम्यान पहिल्या  दैनंदिन, नॉन-स्टॉप सेवेला सुरुवात केली आहे. यामुळे जेट एअरवेज पुणे शहर पूर्वेकडील आर्थिक केंद्राशी जोडणारी भारतातील पहिली व एकमेव विमान कंपनी ठरली आहे.

२०१७मध्ये पुण्याहून सिंगापूरला ३६ हजारांहून अधिक प्रवासी आले. थेट सेवा नसणाऱ्या कोणत्याही भारतीय शहरासाठी ही सर्वाधिक संख्या आहे. आघाडीचे व्यवसाय व व्यापार केंद्र म्हणून पुणे शहराची क्षमता विचारात घेता, पुणे आणि सिंगापूरच्या आजूबाजूच्या प्रदेशांदरम्यानची वाहतूक अधिक विस्तारण्याच्या दृष्टीने जेट एअरवेजची नवी विमानसेवा मदत करणार आहे. औरंगाबाद, अहमदनगर, सोलापूर, कोल्हापूर, सांगली, सातारा, कराड येथील प्रवाशांना सिंगापूर व अन्य अनेक शहरांसाठी ही विमानसेवा सोयीची आणि आकर्षक पर्याय ठरणार आहे.

ऑक्सफर्ड म्हणून ओळखले जाणारे पुणे झपाट्याने वाढत असून, आर्थिक केंद्र म्हणून नावारूपास आले आहे. स्थानिक अर्थव्यवस्थेतील शिक्षण, उत्पादन, पर्यटन अभियांत्रिकी व माहिती तंत्रज्ञान (आयटी) या क्षेत्रांसाठी ही नवी सेवा अतिशय फायदेशीर ठरणार आहे आणि या सेवेमुळे निर्माण होणारी कनेक्टिविटी या प्रदेशातील आर्थिक बाबींच्या विकासामध्ये योगदान देणार आहे.

सिंगापूर हे पूर्वेकडील प्रस्थापित आर्थिक केंद्र आहे आणि अत्यंत लोकप्रिय असे पर्यटनस्थळ आहे. उष्णकटिबंधीय वातावरण, पर्यटनाची ठिकाणे, कन्व्हेन्शन सेंटर असलेल्या सिंगापूरने जगभरातील पर्यटकांचे लक्ष वेधले आहे. गेल्या काही वर्षांत, हे ठिकाण शिक्षण व आरोग्य या क्षेत्रांच्या बाबतीत लोकप्रिय झाले असून, जगातील सर्वोत्तम शैक्षणिक संस्था व रुग्णालायांना सिंगापूरने आकृष्ट केले आहे.

पुणे ते सिंगापूर विमानसेवा, नाइनडब्ल्यू २२ पुणे येथून ५.१० वाजता (भारतीय प्रमाण वेळ) उड्डाण करेल व १३.१५ वाजता (स्थानिक वेळ) सिंगापूर शहरामध्ये उतरेल. परतीच्या प्रवासात, नाइनडब्ल्यू २१ विमान सिंगापूर येथून नऊ वाजता (स्थानिक वेळ) उड्डाण करेल व पुणे शहरामध्ये १२.०५ वाजता (भारतीय प्रमाण वेळ) उतरेल.

पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळावरून ही उद्घाटनपर विमानसेवा सुरू करण्याच्या निमित्ताने, जेट एअरवेजने प्रार्थना केली, त्यानंतर पुणे ते सिंगापूर नाइनडब्ल्यू २२ विमानसेवा सुरू करण्यासाठी जेट एअरवेजचे मुख्य कार्यकारी अधिकारी विनय दुबे यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले. या वेळी खासदार अनिल शिरोळे, राज्यसभेचे खासदार संभाजीराजे छत्रपती, महाराष्ट्र सरकारच्या नागरी विमान वाहतूक सचिव वलसा नायर सिंग, एएआय विमानतळ संचालक अजय कुमार व सिंगापूर पर्यटन मंडळाचे प्रादेशिक संचालक जी. बी. श्रीथर यांसह अनेक मान्यवर व विशेष आमंत्रित उपस्थित होते.  

या प्रसंगी बोलताना जेट एअरवेजचे मुख्य कार्यकारी अधिकारी दुबे म्हणाले, ‘पुणे व सिंगापूर या दरम्यान पहिली विमानसेवा सुरू करणे, हा आमच्यासाठी अभिमानाचा क्षण आहे. पुणे व सिंगापूर या दरम्यान थेट विमानसेवा सुरू करणारी जेट एअरवेज ही पहिली भारतीय विमानकंपनी आहे. मुंबई, दिल्ली व बेंगळुरू या आमच्या केंद्रांतून आम्ही सध्या सहा दैनंदिन विमानसेवा चालवत आहोत. लवकरच, आगामी आठवड्यामध्ये आम्ही अतिरिक्त विमानसेवा सुरू करणार आहोत. या अतिरिक्त विमानांमुळे, आम्हाला नऊ दैनंदिन थेट विमानांद्वारे सिंगापूरसाठी सेवा देता येणार आहे. यामुळे, जेट एअरवेज ही सिंगापूरसाठी व सिंगापूरहून विमानसेवा देणारी सर्वात मोठी कंपनी ठरणार आहे.’

प्रवाशांना तेथून जेट एअरवेजच्या कोडशेअर व इंटरलाइन पार्टनर्सद्वारे फार इस्ट, आशिया-पॅसिफिक प्रदेश व ऑस्ट्रेलिया येथील २१ ठिकाणी जाता येणार आहे. जेट एअरवेज सिंगापूरमार्गे ऑकलंड, बँकॉक, ब्रिस्बेन, देनपासर-बाली, हानोई, हो ची मिन्ह सिटी, जकार्ता, क्वॉलालंपूर, मनिला, मेलबर्न, शांघाय आदी ठिकाणी वन-स्टॉप कनेक्टिविटी देणार आहे.

पुणे येथून उड्डाण करणाऱ्या जेट एअरवेजच्या विमानांमध्ये प्रवासादरम्यान आमच्या प्रसिद्ध इनफ्लाइट उत्पादन व सेवा यांचा लाभ घेता येणार आहे. याबरोबरच, अनेक तासांच्या इनफ्लाइट मनोरंजन व प्रोग्रॅमिंगचाही प्रवाशांना लाभ घेता येणार आहे. यामध्ये लोकप्रिय आंतरराष्ट्रीय व भारतीय चित्रपट, स्पोर्ट्स व टीव्ही सीरिज, ऑडिओ संग्रह यांचा समावेश असेल; तसेच, प्रवाशांना जेवणाचे रुचकर भारतीय, प्रादेशिक व आंतरराष्ट्रीय पर्याय दिले जातील.

‘दोन्ही देशांदरम्यान उद्योग व व्यापारी संबंध विकसित करण्याच्या बाबतीत जेट एअरवेज नेहमीच आघाडीवर राहिली आहे. ही थेट विमानसेवा सुरू केल्याने, पुणे येथील ग्राहक व निर्यातक यांना सिंगापूरला व जवळच्या मलेशियाला कार्गो गुड्स सुरळीतपणे पाठवता येतील. पुणे ताजी फळे, भाज्या यासाठी लोकप्रिय असून, त्यांची निर्यात केली जाते. ही उत्पादने पुणे येथून थेट पाठवल्यास अनेक निर्यातकांचा वेळ व पैसे वाचवले जाणार आहेत. या नव्या कनेक्टिविटीमुळे, पुण्यासाठी निर्यात व आयात या दोन्हींमध्ये वाढ होण्यासाठी मदत होणार आहे,’ असे दुबे यांनी सांगितले.

नवी विमानसेवा सुरू केल्याचा आनंद साजरा करण्यासाठी, जेट एअरवेजने पुण्यापासून ‘इंट्रोडक्टरी रिटर्न इकॉनॉमी’ भाडे जाहीर केले असून, ते केवळ २१ हजार ५०० रुपयांपासून आहे, तर प्रीमिअर भाडे ६५ हजार ५०० रुपयांपासून आहे. हे इंट्रोडक्टरी भाडे एक डिसेंबर २०१८पासून केल्या जाणाऱ्या प्रवासासाठी लागू असेल. प्रवाशांना सिंगापूरमार्गे ब्रिस्बेन, जकार्ता, देनपसार-बाली, फुकेट, कौलालम्पूर, मेलबर्न, सुराबाया, पर्थ, नागी, सिडनी व डार्विन येथे पुढील प्रवास करण्यासाठी प्रवाशांना विशेष भाडे मिळवता येऊ शकते.
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search