Next
वार्धक्यात ज्येष्ठांना ‘मनरेगा’चा आधार
BOI
Wednesday, April 24, 2019 | 12:02 PM
15 0 1
Share this article:

नाशिक : ग्रामीण भागातील अकुशल बेरोजगारांसाठी राबविल्या जाणाऱ्या महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत (मनरेगा) २०१८-१९ या चालू वर्षात नाशिक विभागातील नाशिक, धुळे, जळगाव, अहमदनगर, नंदुरबार या पाच जिल्ह्यांतील ४८ हजार ज्येष्ठ नागरिकांना रोजगार देण्यात आला आहे. म्हणूनच ही योजना ज्येष्ठ नागरिकांसाठी वार्धक्यात आधाराचा हात देणारी ठरत आहे. 

ग्रामीण भागातील अकुशल बेरोजगारांना किमान रोजगार मिळावा, या उद्देशाने शासनातर्फे महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना राबविली जाते. नाशिक विभागातील अहमदनगर जिल्ह्यात १३ हजार २२५, धुळ्यात १० हजार ९७६, जळगावात सहा हजार ४६७, नंदुरबारला  ११ हजार ५४, तर नाशिकमध्ये सहा हजार ६९१ असे एकूण ४८ हजार ४१३ ज्येष्ठ नागरिकांना ‘मनरेगा’अंतर्गत रोजगार देण्यात आला आहे. 

आयुष्यातील बऱ्या-वाईट प्रसंगाच्या अनुभवाची शिदोरी असलेल्या ज्येष्ठांकडूनच पुढची पिढी शिकत असते. शहरी भागात ज्येष्ठ नागरिक संस्था ही संस्कृती बहरली असली, तरी ग्रामीण भागात आजही ज्येष्ठांना पोटाची खळगी भरण्यासाठी कष्टाचे कामे करावी लागत आहेत, हेच ‘मनरेगा’च्या अहवालावरून स्पष्ट होते. 
 
15 0 1
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search