Next
आठवलेंकडून सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचे स्वागत
प्रेस रिलीज
Friday, June 08 | 12:39 PM
15 0 0
Share this story

मुंबई : अनुसूचित जाती आणि जमातींच्या सरकारी कर्मचाऱ्यांना पदोन्नतीमध्ये आरक्षण देण्यास सर्वोच्च न्यायालयाने केंद्रसरकारला परवानगी देणारा निर्णय घेतला असून, याचे स्वागत रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी  केले आहे.

पदोन्नतीमधील आरक्षणाचा अंतिम निर्णय घटनापीठ घेणार असून, तोपर्यंत अनुसूचित जाती जमातींच्या सरकारी कर्मचाऱ्यांना पदोन्नतीमध्ये आरक्षण देण्याचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे. या निर्णयामुळे अनेक ठिकाणी अनुसूचित जाती-जमातींच्या कर्मचाऱ्यांना पदावनतीचा धोका टाळला आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या या निर्णयामुळे अनुसूचित जाती-जमातीच्या कर्मचाऱ्यांचा पदोन्नतीचा मार्ग खुला झाल्याने या निर्णयाचे स्वागत आठवलेंनी केले आहे.
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link