Next
‘होंडा’तर्फे राष्ट्रीय रस्ते सुरक्षा सप्ताह सुरू
प्रेस रिलीज
Tuesday, April 24 | 04:23 PM
15 0 0
Share this storyनवी दिल्ली :
होंडा मोटरसायकल अँड स्कूटर इंडिया प्रा. लि.ने ‘राष्ट्रीय रस्ते सुरक्षा सप्ताह २०१८’ची सुरुवात करून देशभर ‘#हेल्मेटऑनलाइफऑन’ हा संदेश देण्यासाठी देशव्यापी रस्ते सुरक्षा जागृती उपक्रम सुरू केला आहे. राष्ट्रीय रस्ते सुरक्षा सप्ताह २३ ते ३० एप्रिल या कालावधीत साजरा केला जाणार आहे.

‘होंडा’ एका आठवड्यात भारतभरातील हजारो जणांपर्यंत रस्ते सुरक्षा जागृती संदेश पोहोचवणार आहे. ‘होंडा’चे २२ हजार असोसिएट रस्ते सुरक्षेची प्रतिज्ञा करणार आहेत; तसेच, होंडा कॉर्पोरेट, शैक्षणिक संस्था व भारतभरातील पाच हजार ७००+ नेटवर्क यांच्या सहयोगाने विशेष उपक्रमांद्वारे १२ ट्रॅफिक पार्कच्या माध्यमातून जागृतीही केली जाणार आहे.

‘होंडा’चे ब्रँड अम्बेसेडर तापसी पन्नू व अक्षय कुमार यांच्या उपस्थितीत ‘ऑटो एक्स्पो २०१८’मध्ये प्रचंड फॅन फेअरची घोषणा केली असून, टू-व्हीलर चालवत असताना हेल्मेट घालण्याचे महत्त्व याविषयी ‘#हेल्मेटऑनलाइफऑन’ रस्ते सुरक्षा अभियान सर्व वयोगटांमध्ये जागृती करणार आहे.

‘होंडा’च्या दृष्टिकोनाविषयी बोलताना ‘होंडा मोटरसायकल’चे उपाध्यक्ष प्रभू नागराज यांनी सांगितले, ‘एक जबाबदार टू-व्हीलर उत्पादक म्हणून, ‘होंडा’ने रस्ते सुरक्षा हा संदेश प्रत्येकापर्यंत नेणार आहे. ‘ऑटो एक्स्पो’मध्ये जाहीर केलेले ‘#हेल्मेटऑनलाइफऑन’ हे या दिशेने टाकलेले पाऊल आहे. या अभियानांतर्गत १.६ लाख जणांना प्रशिक्षित करण्यात आले असून, राष्ट्रीय रस्ते सुरक्षा सप्ताह आणखी पुढे जाऊन भारतभरातील लोकांना सहभागी करून घेणार आहे.’

भारतातील रस्ते सर्वांसाठी सुरक्षित करण्यासाठी ‘होंडा’ पाच हजार ७००+ टचपॉइंटमध्ये रस्ते सुरक्षा प्रशिक्षण व जागृती उपक्रमही सुरू करत आहे. दररोज हजारो ग्राहक सहभागी होत असून, हेल्मेटचा वापर करण्यास उत्तेजन देण्याच्या हेतूने रायडिंग ट्रेनर सिम्युलेटर्स, सुरक्षेची प्रतिज्ञान, सेफ्टी क्विझ असा सर्वांना सहभागी करून घेणारे रस्ते सुरक्षा उपक्रम आयोजित केले जातील.

केवळ हेल्मेटचा वापरच नाही, तर रस्ते वापराविषयक अन्य महत्त्वाचे पैलूही पाच भौगोलिक प्रदेशांतील १२ होंडा ट्रॅफिक पार्कांमध्ये प्रसृत केले जाणार आहे. बालके व प्रौढ यांचा समावेश असलेल्या सर्व वयोगटांसाठी, आंतरराष्ट्रीय स्तरीय प्रशिक्षण घेतलेले रस्ते सुरक्षा इन्स्ट्रक्टर खास तयार केलेली प्रशिक्षण मोड्युल प्रत्यक्षात राबवणार आहेत.

‘होंडा’ची रस्ते सुरक्षेविषयी बांधिलकी :
होंडा टू-व्हीलर्स इंडियाचे रस्ते सुरक्षेला सर्वाधिक प्राधान्य आहे. आतापर्यंत ‘होंडा’ने १७ लाखांहून अधिक भारतीयांना रस्ते सुरक्षेचे धडे दिले आहेत. होंडा सेफ्टी रायडिंग व प्रशिक्षण कार्यक्रमामुळे दररोज वर्किंग प्रोफेशनल, कॉलेजचे विद्यार्थी, गृहिणी किंवा ज्येष्ठ नागरिक अशा विविध व्यक्तींचे स्वतंत्र व सुरक्षित रायडर होण्याचे स्वप्न साध्य होत आहे. ‘होंडा’ने या कारणासाठी दिल्ली (२), जयपूर, चंडीगड, भुवनेश्वर, कटक, येवला (नाशिक), इंदूर, हैदराबाद, लुधियाना, कोईम्बतूर, कर्नल येथे एकूण १२ ट्रॅफिक पार्क दत्तक घेतली आहेत.
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link