Next
विशाल चोरडिया यांना पुरस्कार प्रदान
प्रेस रिलीज
Wednesday, May 16, 2018 | 11:55 AM
15 0 0
Share this story

पुणे : आंत्रप्रेन्युअर्स ऑर्गनायझेशन (ईओ) या जगभरातील यशस्वी उद्योजकांच्च्या नेटवर्क संघटनेतर्फे भारतीय उद्योजक व महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळाचे (एमएसकेव्हीआयबी) अध्यक्ष विशाल चोरडिया यांना या संघटनेतर्फे ‘ईओ ग्लोबल सिटीझन ऑफ द इअर २०१८’ या पुरस्काराने गौरवण्यात आले.

‘ईओ’ सदस्याचा व्यावसायिक व कल्पक दृष्टिकोन आणि परिणामकारक व्यावसायिक क्रियांमुळे सर्व सीमा ओलांडून लोकांची आयुष्ये सुधारली जाऊ शकतात आणि सर्व ‘ईओ’ सदस्यांसाठी व जागतिक व्यापारक्षेत्रासाठी जो सदस्य आदर्शवत ठरतो, त्याला ‘ग्लोबल सिटीझन ऑफ द इअर’ हा अत्यंत मानाचा समजला जाणारा वार्षिक पुरस्कार देण्यात येतो. विकसनशील देशांमध्ये उद्योजकतेत वाढ करण्यासाठी प्रेरणा ठरून शिक्षणसंस्थांची उभारणी करणार्‍या, तसेच क्रांतिकारी व किफायतशीर आरोग्यसेवा पुरवून दुर्लक्षित समाजगटाच्या विकासासाठी हातभार लावणार्‍या भारतीय उद्योजकांच्या वारश्यात विशाल चोरडिया यांनी आपले स्थान निर्माण केले आहे.

‘ईओ’ पुणे चॅप्टरचे संस्थापक सदस्य व कृतीशील व्यावसायिक चोरडिया यांनी गेली दोन दशके महाराष्ट्रातील ग्रामीण भागाच्या विकासासाठी अथक परिश्रम घेतले आहेत. सुहाना ही कोट्यवधी रुपयांची वार्षिक उलाढाल असलेली मसाले उत्पादक कंपनी त्यांच्या मालकीची असून, त्यांनी गेल्यावर्षी ‘एमएसकेव्हीआयबी’च्या अध्यक्षपदाची सूत्रे हाती घेतली. ग्रामीण भागातील व्यावसायिकांना आर्थिक व सामाजिक असमानतेचा नायनाट करण्याची संधी देणारी इतकी कल्पक भूमिका ओळखून त्यांनी ‘महाखादीठ’ हा महाउपाम सुरू केला. राज्याच्या ग्रामीण भागातील कुशल कारागिरांना रोजगाराच्या संधी उपलब्ध व्हाव्यात व ग्रामीण उद्योगक्षेत्रावरील गरिबीचे सावट दूर व्हावे, हा या उपामाचा उद्देश आहे.

‘अत्यंत महत्त्वाचे असे ‘ईओ’चे स्पिरीट विशाल यांच्या रक्तात भिनले असल्याने जगातील व्यापारी नेतृत्वासाठी ते आदर्श ठरत आहेत. समाजाप्रती असलेली त्यांची निष्ठा व प्रतिबद्धता, तसेच त्यांच्या दृष्टिकोनामुळे त्यांना व्यक्तिगत आयुष्यातही यशोशिखर गाठता आले असून, नुकतेच त्यांनी ‘एमएसकेव्हीआयबी’लाही घवघवीत यश मिळवून दिले आहे. ‘ईओ’मध्ये विशाल साीय सहभागी असल्याचा आम्हाला आनंद होत असून त्यांना ग्लोबल सिटीझन ऑफ द इअर पुरस्कार देताना आम्हाला सार्थ अभिमान वाटतो आहे,’ असे ‘ईओ’चे जागतिक अध्यक्ष ब्रायन ब्रॉल्ट म्हणाले.

चोरडिया म्हणाले, ‘समाजाचे ऋण फेडणे आणि महाराष्ट्रातल्या ग्रामीण व्यावसायिकांना व कलाकारांना सक्षम करणे हे माझे ध्येय आहे. त्यामुळे या ध्येयाच्या दिशेने माझ्या करीअरची पावले वळवणे मला अधिक सोपे गेले. माझ्या सहव्यावसायिकांकडून प्रेरणा घेऊन स्वप्न सत्यात उतरवण्याची संधी देणारे आणि खूप काही नवीन गोष्टी शिकवणारे आंत्रप्रेन्युअर्स ऑर्गनायझेशन हे महत्वपूर्ण व्यासपीठ असल्याने या संघटनेसोबतचे माझे नातेही तितकेच महत्वाचे आहे. या कामाचा आपल्या समाजावर व अर्थव्यवस्थेवरही तितकाच सकारात्मक परिणाम साधला जातो आहे,’ असे ‘एमएसकेव्हीआयबी’चे अध्यक्ष विशाल चोरडिया म्हणाले.

हा पुरस्कार ‘ईओ’ ग्लोबल लीडरशीप कॉन्फरन्स (जीएलसी) या परिषदेदरम्यान देण्यात आला. अन्य ‘ईओ’ सदस्यांना भेटण्यासाठी व नेतृत्व कौशल्य, दृष्टिकोन व जागरूकता अंगिकारण्यासाठी यावेळी ५४ देशांतील एक हजार ५०० हून अधिक उद्योजक उपस्थित होते.
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link