Next
‘राष्ट्रवादी काँग्रेसने कलाक्षेत्राच्या समस्या सोडवाव्या’
प्रेस रिलीज
Wednesday, November 22, 2017 | 06:04 PM
15 0 0
Share this story

पुणे : ‘राष्ट्रवादी काँग्रेसने सांस्कृतिक विभागाद्वारे कलाक्षेत्राच्या समस्या सोडविण्यासाठी प्रयत्न करावे. कलाकारांवर दडपण न येता त्यांना अभिव्यक्ती स्वातंत्र्य मिळाले पाहिजे. त्यांच्या नैसर्गिक कलागुणांना पोषक वातावरण मिळण्यासाठी कार्यरत रहावे’, असे आवाहन माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या पुणे शहर सांस्कृतिक विभागाच्या मेळाव्यात ते बोलत होते. हा मेळावा बारामती हॉस्टेल येथे झाला. या मेळाव्यात पुणे शहर सांस्कृतिक विभागाची कार्यकारिणी घोषित करण्यात आली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ‘राष्ट्रवादी’च्या पुणे शहराध्यक्ष खासदार अ‍ॅड. वंदना चव्हाण होत्या.

‘मोदी सरकारच्या जीएसटी निर्णयामुळे व नोट बंदीमुळे कला क्षेत्राला खूप फटका बसला,’ अशी टीकाही पवार यांनी या वेळी केली.

राष्ट्रवादी काँग्रेस पुणे शहर सांस्कृतिक विभागाच्या शहराध्यक्षपदी बाबासाहेब पाटील यांची नियुक्ती करण्यात आली. बाबासाहेब पाटील हे यापूर्वी वृक्ष प्राधिकरण समितीवर कार्यरत होते. निर्माते माणिक बजाज, दरबार बँडचे प्रमुख इक्बाल दरबार यांची शहर संघटकपदी, तर निर्माते नीलेश नवलाखा, अभिनेत्री पूजा पवार, नितीन मोरे, शेखर गरूड, माया धर्माधिकारी यांची शहर उपाध्यक्ष पदावर नियुक्ती करण्यात आली.

विधानसभा अध्यक्षनिहाय नियुक्त्या अशा : माधवी मोरे (खडकवासला मतदारसंघ), जुई भगत (कसबा विधानसभा मतदारसंघ), शाल्मीरा पुंड (शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघ), शैलेश जाधव (कोथरूड विधानसभा मतदारसंघ), दिलीप मोरे (हडपसर मतदारसंघ), रोहिणी तारे (पर्वती मतदारसंघ), भास्कर नागमोडे, योगेश सुपेकर.

पुण्यात पालिकेच्या सहकार्याने कलाकार भवन उभारणे, पालिकेची सांस्कृतिक समिती करण्यासाठी आग्रह धरणे, कलाकारांना विशेष वैद्यकीय सुविधा, राज्य सरकारकडून उपचारासाठी अनुदान कार्ड मिळावे, अशा मागण्यांचा पाठपुरावा करणार असल्याचे अध्यक्ष बाबासाहेब पाटील यांनी या वेळी सांगितले.
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link