Next
‘हे प्रभू’ वेब सिरीजमधून शशांक घोष डिजिटल दुनियेत
BOI
Saturday, February 09, 2019 | 06:43 PM
15 0 0
Share this story

शशांक घोषमुंबई : चित्रपट ‘वीरे दी वेडिंग’चे दिग्दर्शक शशांक घोष यांनी ‘हे प्रभू’ या वेब सिरीजच्या माध्यमातून आपण डिजिटल दुनियेत पाऊल ठेवत असल्याचे सांगितले आहे. नुकतीच त्यांनी याबाबत घोषणा केली. एक तरुण त्याच्यासमोर आज असलेली आव्हाने आणि डिजिटल मिडियाची गुंतागुंत असा या वेब सिरीजचा विषय असेल. 

‘आजकालची तरुण पिढी आणि त्यांचे आयुष्य यावर संशोधन करणारी ही वेब सिरीज असेल. अशी कोणती गोष्ट आहे, की जी या तरुणांना दररोज उर्जा देते आणि त्यांना सक्रीय बनवते. या मुलांचे एक आभासी जग, जे सत्यात उतरवता येऊ शकते. अशा रोजच्या जीवनातल्या घटनांवर, हळव्या क्षणांवर आधारित ही सिरीज आहे.
तरुणांचा जीवन जगतानाचा घरातील आणि घराबाहेरीलही संघर्ष यातून दाखवला जाणार आहे’, अशी माहिती शशांक घोष यांनी दिली आहे. 

लवकरच ‘हे प्रभू’ ही वेब सिरीज ‘एमएक्स प्लेअर’वर प्रदर्शित होणार आहे. अभिनेता रजत बरमेचा तरुण प्रभूच्या भूमिकेत दिसणार आहे. 
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link