Next
‘प्रेमा तुझा रंग कसा’चा दुसरा सीझन लवकरच
अजिंक्य देव करणार सूत्रसंचालन
प्रेस रिलीज
Friday, September 14, 2018 | 04:54 PM
15 0 0
Share this article:

मुंबई : ‘प्रेमा तुझा रंग कसा’च्या पहिल्या पर्वाला मिळलेल्या उदंड प्रतिसादानंतर स्टार प्रवाह वाहिनी या कार्यक्रमाचा दुसरा सीझन घेऊन प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. विशेष म्हणजे सुप्रसिद्ध अभिनेते अजिंक्य देव दुसऱ्या पर्वाचे सूत्रसंचालन करणार आहेत.

‘प्रेमा तुझा रंग कसा’चे दुसरे पर्व १७ सप्टेंबरपासून सोमवार ते शनिवार रात्री ९.३० वाजता ‘स्टार प्रवाह’वर प्रसारित केले जाणार आहे. या मालिकेच्या पहिल्या सीझनमध्ये प्रेमकथा, त्यातून घडणारे गुन्हे आणि त्यांचा तपास दाखवण्यात आला. या सीझनमध्येही प्रेमाची अनेक रंगरूप पाहायला मिळतील. आपल्या आजुबाजूला घडणाऱ्या अनेक गुन्ह्यांच्या घटनांविषयी आपण ऐकत असतो, वाचत असतो. ‘प्रेमा तुझा रंग कसा’ ही मालिका समाजत घडणाऱ्या याच घटनांविषयी जागृत करण्याचा प्रयत्न करणार आहे.

‘स्टार प्रवाह’ने नेहमीच चाकोरीच्या बाहेरचा विचार केला आहे. वेगळे विषय, वेगळी मांडणी आणि नवीन कलाकार आपल्या कार्यक्रमांतून, मालिकांतून प्रेक्षकांसमोर आणले आहेत. म्हणूनच मराठी मनोरंजन क्षेत्रात ‘स्टार प्रवाह’ची स्वतंत्र अशी ओळख आहे. हीच ओळख ‘प्रेम तुझा रंग कसा’ मालिका अधोरेखित करणार आहे.

मालिकेच्या दुसऱ्या पर्वातून धक्कादायक गुन्हे आणि त्यांचा तपास या मालिकेतून दाखवला जाणार आहे. अजिंक्य देव यांच्या खास शैलीने या मालिकेतल्या कथांचे नाट्य अधिक खुलणार आहे.
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search