Next
प्रविण तरडे यांची नवीन कलाकृती- सरसेनापती हंबीरराव
शिवजयंतीच्या मुहूर्तावर ऐतिहासिक चित्रपटाची घोषणा
BOI
Wednesday, February 20, 2019 | 03:03 PM
15 0 0
Share this article:

पुण्यात शिवजयंतीच्या निमित्त निघालेल्या भव्य मिरवणूक सोहळ्यात प्रविण विठ्ठल तरडे यांनी सरसेनापती हंबीरराव या चित्रपटाची घोषणा केली.

पुणे : हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज या दोन्ही छत्रपतींचे सरसेनापती म्हणून आपला दबदबा निर्माण केलेले कर्तृत्ववान व्यक्तिमत्व, धगधगता आणि ज्वलंत इतिहास म्हणजे सरसेनापती हंबीरराव मोहिते. स्वराज्याच्या निर्मिती आणि जडणघडणीमध्ये मोलाचे योगदान असलेल्या सरसेनापती हंबीरराव मोहिते यांचे कार्य लवकरच रुपेरी पडद्यावर दिसणार आहे. पुण्यात शिवजयंतीच्या निमित्त निघालेल्या भव्य मिरवणूक सोहळ्यात लेखक, दिग्दर्शक, अभिनेते प्रविण विठ्ठल तरडे यांनी या चित्रपटाची घोषणा केली.

या वेळी शिवनेरी फाउंडेशनचे अध्यक्ष आणि हंबीरराव मोहिते यांचे वंशज संदीप मोहिते पाटील, बीव्हीजी ग्रुपचे हणमंतराव गायकवाड, जिल्हा परिषद सदस्य आणि युवा नेते रोहित पवार, आमदार भीमराव तापकीर, दत्तात्रय धनकवडे, अमित गायकवाड, अभिनेता रमेश परदेशी, देवेंद्र गायकवाड,  महेश हगवणे, न्यूक्लियस सप्लिमेंटचे श्रीपाद चव्हाण, लीड मीडियाचे विनोद सातव आदी मान्यवर उपस्थित होते.

या भव्य, ऐतिहासिक चित्रपटाची निर्मिती शिवनेरी फाउंडेशन करत असून, संदिप मोहिते पाटील, सौजन्य निकम, धर्मेंद्र बोरा हे चित्रपटाचे निर्माते आहेत, तर चित्रपटाची कथा, पटकथा, संवाद आणि दिग्दर्शन प्रविण तरडे यांचे असणार आहे.

चित्रपटाबद्दल बोलताना प्रविण तरडे म्हणाले, ‘हंबीरराव मोहिते हे छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांचे सरसेनापती होते. त्यांनी आपल्या चाणाक्ष बुद्धीने स्वराज्याला श्रीमंत केले. हंबीरराव मोहितेंच्या नजरेतून मराठा साम्राज्य या चित्रपटात बघायला मिळेल.’

‘मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीतील अनेक दिग्गज, नामवंत कलाकार या चित्रपटात दिसणार आहेत. हंबीरराव यांच्या प्रमुख भूमिकेत कोण? याचा उलगडा शिवराज्याभिषेक दिनी म्हणजेच सहा जून २०१९ रोजी होईल. हा चित्रपट जानेवारी २०२० मध्ये प्रेक्षकांच्या भेटीला येईल,’ असेही तरडे यांनी सांगितले.

 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search