Next
१६ वर्षीय ग्रेटा थुंबर्गला शांततेच्या ‘नोबेल’साठी नामांकन
BOI
Friday, March 22, 2019 | 06:39 PM
15 0 0
Share this article:

ग्रेटा थूंबर्ग

स्वीडनमध्ये वास्तव्य करणाऱ्या १६ वर्षांच्या ग्रेटा थुंबर्ग या मुलीला शांततेच्या नोबेल पुरस्कारासाठी नामांकन मिळाले आहे. पाकिस्तानच्या मलाला युसुफझाईने वयाच्या १७व्या वर्षी नोबेल पुरस्कारावर मोहर उमटवली होती. ग्रेटाला हा पुरस्कार मिळाला, तर ती जगातील सर्वांत कमी वयाची नोबेल पुरस्कार विजेती ठरेल.

पर्यावरणप्रेमी ग्रेटा ही ‘अस्पर्जर सिंड्रोम’ नावाच्या आजाराने ग्रस्त आहे. हवेचे प्रदूषण, पर्यावरणाच्या समस्या, वृक्षतोड, तापमानात सातत्याने होणारी वाढ या सगळ्याबद्दल आवाज उठविणाऱ्या ग्रेटाला तिच्या या पर्यावरणविषयक कार्यासाठी हे नामांकन जाहीर झाले आहे. पर्यावरणाची हानी रोखण्यासाठी मागील वर्षी ऑगस्ट महिन्यात तिने स्वीडनच्या संसदेसमोर एक आंदोलन केले होते. ‘फ्रायडे फॉर द फ्युचर’ या नावाने पुढे हे आंदोलन गाजले. केवळ स्वीडनमध्येच नाही, तर आंतरराष्ट्रीय स्तरावर ग्रेटाच्या या आंदोलनाची दखल घेतली गेली. 

अनेक देशांमधील माध्यमांनी ग्रेटाच्या या आंदोलनाची आणि ती करत असलेल्या कार्याची दखल घेतली. जर्मनी, ब्रिटन, फ्रान्स, बेल्जियम, ऑस्ट्रेलिया, जपान या देशांसहित इतर १०० देशांमध्ये तिचे हे आंदोलन पोहोचले. या देशांमध्येही यासाठी आंदोलने केली गेली. हाच विषय घेऊन ‘वर्ल्ड इकोनॉमिक फोरम’मध्येही ग्रेटाला आपली भूमिका मांडण्याची संधी मिळाली. 

त्यानंतर डिसेंबर २०१८मध्ये पोलंड याठिकाणी झालेल्या ‘युनायटेड नेशन्स क्लायमेट चेंज कॉन्फरन्स’मध्येही ग्रेटाला याबाबत बोलण्याची संधी मिळाली. ‘जमिनीखाली असलेल्या तेल व खनिज साठ्यांची आपण बचत केली पाहिजे. याबाबत जगभरात समानता येण्यासाठीही प्रयत्न केले गेले पाहिजेत आणि या गोष्टी जर व्यवस्थेत राहून होऊ शकणार नसतील, तर ती व्यवस्थाच आपण बदलली पाहिजे अथवा नष्ट केली पाहिजे’, अशा आशयाचे भाषण तिने या परिषदेत केले होते. या भाषणानंतर जगभरातील पर्यावरणतज्ज्ञ, अभ्यासक आणि माध्यमे यांनी ग्रेटाची दखल घेतली.  
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search