Next
रव्याचे घारगे
BOI
Wednesday, November 29 | 09:45 AM
15 1 0
Share this story

रव्याचे घारगे

थंडीच्या दिवसांत मुलांबरोबरच मोठ्यांनाही संध्याकाळी नाश्ता म्हणून काही तरी वेगळे आणि त्यातही गरम खाण्याची इच्छा असते. या दिवसांत गूळ वापरून केलेले उबदार गोड पदार्थ तर सर्वांच्याच आवडीचे असतात. यासाठीच ‘पौष्टिक डब्याची चविष्ट रेसिपी’ या सदरात या वेळी आपण पाहत आहोत गूळ वापरून केलेले रव्याचे घारगे...
................... 
थंडीच्या दिवसांत जास्तीत जास्त गरम पदार्थ खाण्याची इच्छा असते. या दिवसांत गरम खाल्लेले पौष्टिकही असते. असाच आजचा हा पदार्थ आहे. रव्याच्या हे घारगे गरम गरम अप्रतिम लागतात. हा पदार्थ थोडासा तेलकट होतो म्हणून टिश्यू पेपरवर ठेवावा. गूळ असल्यामुळे तो खमंग लागतो. शिवाय खसखस लावल्याने फारच सुरेख दिसतो. घारगे दोन दिवस व्यवस्थित टिकतात.

साहित्य : 
रवा – एक वाटी, गूळ – एक वाटी, तूप - पाव वाटी पेक्षा थोडे कमी, बाजरी किंवा ज्वारीचे पीठ -  दोन चमचे, तळण्यासाठी तेल, खसखस - पाव चमचा.


कृती : 
- सर्वप्रथम एका कढईत तूप घेऊन, तुपात रवा भाजून घ्या.
- दुसरीकडे पाणी गरम करायला ठेवा.
- या भाजलेल्या रव्याचा गूळ घालून शिरा करून घ्या.
- शिरा थंड झाल्यावर त्यात दोन चमचे बाजरीचे/ज्वारीचे पीठ घाला.
- या मिश्रणाला पाण्याचा हात लावून छान मळून घ्या.
- त्याचा एक गोळा तयार करा.
- तळण्यासाठी तेल गरम करायला ठेवा.
- वरील गोळ्याचे लिंबाएवढे गोळे करून, हातावर थापून घ्या.
- त्यावर थोडी खसखस दाबून लावा.
- तेल चांगले तापल्यावर हे घारगे त्यात तळून घ्या. 
- घारगे तळताना अनारस्याप्रमाणे खसखस असलेली बाजू वर ठेवून तळा.
- ते एकाच बाजूने तळा. 
- खसखस लावलेली नसेल, तर घारगे दोन्ही बाजूंनी तळण्यास हरकत नाही. 

- आश्लेषा भागवत
मोबाइल : ९४२३० ०८८६८ 
ई-मेल : ashlesha0605@gmail.com

(लेखिका पुण्यातील आहारतज्ज्ञ आहेत.)

रव्याचे घारगे
 
15 1 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link