Next
भा. द. खेर
BOI
Tuesday, June 12, 2018 | 12:00 AM
15 0 0
Share this story

सुप्रसिद्ध कादंबरीकार आणि चरित्रकार भा. द. खेर यांचा १२ जून हा जन्मदिन. त्यानिमित्त आजच्या ‘दिनमणी’मध्ये त्यांचा अल्प परिचय...
.....
१२ जून १९१७ रोजी कर्जतमध्ये (अहमदनगर) भालचंद्र दत्तात्रेय खेर हे कथाकार, कादंबरीकार, अनुवादक आणि मनस्वी पत्रकार म्हणून प्रसिद्ध आहेत. एकीकडे हिंदुराष्ट्र, भारत आणि केसरीसारख्या वृत्तपत्रांत भरीव कामगिरी करत असतानाच त्यांनी रोहिणी आणि सह्याद्रीसारख्या मासिकांचं संपादनही केलं होतं. त्यांनी चाळीसच्या दशकानंतर दीर्घ काळ पुष्कळ लेखन केलं. त्यांची जवळपास ११७ पुस्तकं प्रसिद्ध झाली आहेत. त्यांनी उत्तमोत्तम कादंबऱ्या आणि नाटकं मराठीत आणली.  लोकमान्य टिळक, सावरकर, गजानन महाराज, साईबाबा अशांची चरित्र लोकांसमोर आणली. कथा-कादंबरीबरोबरच त्यांनी नाटकं, प्रवासवर्णनं, निबंध, चरित्रं, चरित्रात्मक कादंबऱ्या, कुमार वाङमय, संतचरित्रं अशा विविध वाङ्मयप्रकारात त्यांनी आपलं योगदान दिलं आहे. ‘यज्ञ’या त्यांच्या स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या जीवनावर लिहिलेल्या चरित्रात्मक कादंबरीला प्रकाशनापूर्वीच ११ हजार प्रतींची नोंद होण्याचं भाग्य लाभलं होतं.   

दिग्विजय, आनंद जन्मला, कल्पवृक्ष, क्रांतीच्या वाटेवर, गुलाबाचं फूल, चक्रव्यूह, नंदादीप, प्रायश्चित, बर्लिन गंगेला मिळाले, वादळवारा, विजय, शुभमंगल, सुखाचा लपंडाव, हिरोशिमा, हसरे दु:ख, लोकोत्तर नेते लोकमान्य टिळक, निरोप, रिगेटा, श्री गजानन दर्शन, चाणक्य, दी प्रिन्सेस, विन्टर्स टेल, येथे ग्रह बदलून मिळतील - अशी त्यांची अनेक पुस्तकं प्रसिद्ध आहेत. 

साहित्यसम्राट न.चिं. केळकर पुरस्कार, हरी नारायण आपटे पुरस्कार, शिवाजी सावंत स्मृती पुरस्कार अशा पुरस्कारांनी त्यांना सन्मानित केलं गेलं आहे. 

२१ जून २०१२ रोजी त्यांचं पुण्यात निधन झालं.

(भा. द. खेर यांची पुस्तकं ‘बुकगंगा डॉट कॉम’वरून घरपोच मागविण्यासाठी येथे क्लिक करा. खेर यांच्याबद्दल अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा. दररोज प्रसिद्ध होणाऱ्या ‘दिनमणी’ सदरातले स्फुट लेख एकत्रितरीत्या https://goo.gl/QMr7oP या लिंकवर वाचता येतील.)
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link