Next
रसायनयुक्त आहाराबद्दल जागृती कार्यक्रम
डोंबिवलीत होणार वृक्षामृत वाटप व प्रशिक्षणाचा शुभारंभ
प्रशांत सिनकर
Thursday, April 04, 2019 | 06:00 PM
15 0 0
Share this article:


ठाणे : कीटकनाशकांचा मारा केलेले अन्न सेवन केल्यास होणारे विकार टाळण्यासाठी ‘कॉस्मिक इकोलॉजिकल ट्रस्ट’ व ‘मैत्री फाउंडेशन’ यांच्या संयुक्त विद्यमाने अशा केमिकलयुक्त आहाराविरोधात मोहीम सुरू करण्यात येणार आहे. तातडीचा उपाय म्हणून घरच्या घरी संपूर्णपणे सेंद्रिय पद्धतीने आरोग्यदायी ‘मायक्रोग्रीन्स’ मिळविण्यासाठी वृक्षामृत वाटप व प्रशिक्षणाचा आरंभही करण्यात येणार आहे. 

सहा एप्रिल, गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर डोंबिवलीत या मोहिमेचा शुभारंभ होईल. शेतीमध्ये अवाजवी वापरली जाणारी रासायनिक खते, तसेच कीटकनाशके यांमुळे अन्नधान्यामध्ये विषारी घटकांचे प्रमाण वाढले आहे. अशा अन्नपदार्थांच्या सेवनाने वेगवेगळे विकार होत आहेत. या पार्श्वभूमीवर डोंबिवली येथील मानपाडा रोडवरील राजहंस सोसायटीच्या प्रांगणात सकाळी आठ ते १२ वाजेपर्यंत हा कार्यक्रम होणार आहे. सरकारने रासायनिक खतांवर बंदी घालावी, यासाठी या वेळी स्वाक्षरी मोहीम राबवण्यात येणार आहे. तसेच राज्यभरात ‘मायक्रोग्रीन्स’ व ‘वृक्षामृत’ प्रचार-प्रसार कार्यक्रम राबविण्यात येणार आहेत. याप्रसंगी उपस्थितांना वृक्षामृताचे मोफत वाटप करण्यात येणार आहे, अशी माहिती आयोजक डॉ. उदयकुमार पाध्ये व सृष्टी गुजराथी यांनी दिली. 

‘आहारात पालेभाज्या हव्यातच; पण त्या गटाराच्या विषारी पाण्यावर वाढलेल्या नकोत. अलीकडे शेतात रासायनिक खते आणि कीटकनाशके वापरण्याचे प्रमाण बेसुमार वाढले आहे. आधीच श्वासातून आत जाणारी हवा शुद्ध राहिलेली नाही. त्यात आता पोटात जाणारे जेवणही विषारी होऊ लागले आहे. अशा परिस्थितीत अनेकांना वेगवेगळ्या विकारांचा सामना करावा लागत आहे. उच्च रक्तदाब – मधुमेह हे आजार तर आता सामान्य वाटू लागले आहेत. सध्या हृदयविकार, कर्करोग यांची दहशत आहे. या परिस्थितीला कारणीभूत असलेल्या केमिकलयुक्त आहाराविरोधात या कार्यक्रमातून जागृती मोहीम राबविण्यात येणार आहे’, असे आयोजकांनी सांगितले.

‘सरकारी पातळीवर बंदी येईल तेव्हा येईल; मात्र तातडीची उपाययोजना म्हणून आपण आपल्या आहारातील विषारी रसायने नक्कीच कमी करू शकतो. विषारी सांडपाण्यावर वाढवलेल्या पालेभाज्यांमध्ये पोषण शोधण्यापेक्षा घरच्या घरी मायक्रोग्रीन्स वाढवता येतील. यासाठी शेण, गोमूत्र, गूळ, बेसन व वडाच्या झाडाखालील माती आदींचे मिश्रण असलेले वृक्षामृत वापरले, तर रसायनमुक्त भाजीपाल्याचे उत्पादन करणे सहज शक्य आहे. शिवाय या उपायाने कुंड्यांखाली साचलेल्या पाण्यात वाढणाऱ्या डासांपासूनही मुक्ती मिळेल. उंदरांचा त्रासही कमी होईल. सरकारने ठरवले तर डम्पिंग ग्राउंडवर वाढत चाललेल्या कचऱ्याच्या डोंगराचे सुपिक मातीत रूपांतर करण्याचे सामर्थ्यही या वृक्षामृतात आहे. अशा या बहुगुणी - बहुपयोगी वृक्षामृताचा प्रचार व प्रसार करण्यासाठी हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. हा कार्यक्रम मोफत असून, त्याचा सर्वांनी लाभ घ्यावा व रसायनमुक्त जीवनशैलीच्या प्रसारात सहभागी व्हावे’, असे आवाहन मैत्री फाउंडेशनच्या अध्यक्षा सृष्टी अंकोलेकर-गुजराथी यांनी केले आहे. 

या वेळी ‘कॉस्मिक इकोलॉजिकल ट्रस्ट’चे अध्यक्ष डॉ. उदयकुमार पाध्ये विशेष मार्गदर्शन करणार असून, डॉ. विजयकुमार पोंक्षे, डॉ. अशोक जैन, राधाकृष्ण गायतोंडे, सुरेखा अभ्यंकर, सुधीर इनामदार, प्रवीण गावडे, वैष्णवी नवले, मनोज वैद्य, सुधीर बरडे, सुनील शेवडे, मृणाल इनामदार, सुनील आंबर्डेकर, विकास अभ्यंकर, शैलेश जोशी, ज्ञानेश्वर परब आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.
COMMENTS
BDGramopadhye About 80 Days ago
This information sjould be made available to all . Government has the tools for the purpose .
0
0
BHAGWAT More About 104 Days ago
Dhalkhada
0
0
mohan About 107 Days ago
रासायनिक खतांवर बंदी नको . पोषण मुलद्रव्यांनी युक्त जर अन्न हवे असेल तर या खतांबर बंदी नको . ही खते वनस्पतींचे अन्न आहेत . ही गोष्ट आपण समजून घेतली पाहीजे . मात्र रासायनिक कीटकनाशके व बुरशीनाशके घातक आहेत .
0
0
सुरेखा अभ्यंकर About 109 Days ago
धन्यवाद खूप छान जनजागृती
0
0

Select Language
Share Link
 
Search