Next
संत्र्यांसाठी एकात्मिक प्रकल्प
BOI
Tuesday, May 16, 2017 | 05:30 PM
15 0 0
Share this article:

प्रातिनिधिक फोटोनागपूर : विदर्भातील संत्री, डाळिंब उत्पादकांना सक्षम करण्यासाठी कोलकाता येथील डालग्रीन अॅग्रोबेस कंपनीने पुढाकार घेतला आहे. काटोल येथे संत्री आणि डाळिंब प्रक्रिया प्रकल्प उभारण्याची नुकतीच सुरुवात झाली आहे.

विदर्भात दीड लाख हेक्टरवर संत्रा लागवड केली जाते. परंतु, गेल्या दोन-तीन वर्षांपासून संत्री उत्पादकांना अल्प दराचा फटका सहन करावा लागत आहे. उत्पादनाच्या तुलनेत संत्र्यांना अधिक मागणी असल्याने आणि प्रक्रिया उद्योगांचा अभाव असल्याने विविध अडचणींना तोंड द्यावे लागत आहे. हीच अडचण आणि नागपूरच्या संत्र्यांची मागणी लक्षात घेऊन कोलकाता येथील डालग्रीन अॅग्रोबेस कंपनीने संत्री व डाळिंब लागवड प्रकल्प उभारण्याचा निर्णय घेतला. ही कंपनी ‘फार्म टू फर्म’ संकल्पनेवर आधारित संत्र्यांचे उत्पादन घेणार आहे. हा प्रकल्प एकूण चार टप्प्यांत पार पडेल. या प्रकल्पाला एकात्मिक फलोत्पादन प्रकल्प (इंटिग्रेटेड हॉर्टिकल्चर प्रोजेक्ट) असे नाव देण्यात आले आहे. 

प्रातिनिधिक फोटोशेतकऱ्यांना रोपांची लागवड, त्यांचे संगोपन, आधुनिक तंत्रज्ञान, दर्जेदार आणि गुणवत्तापूर्ण उत्पादन, शीतगृह, उत्पादित मालाला बाजारपेठ, ग्रेडिंग, पॅकेजिंग, ब्रँडिंग यांसारख्या गोष्टी उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. डालग्रीन कंपनी संत्री उत्पादकांना वेगळ्या पद्धतीने संत्री लागवड करण्याचे मार्गदर्शन, त्यासंबंधीचे उपयुक्त तंत्रज्ञान उपलब्ध करून देणार आहे. हा प्रकल्प संपूर्ण विदर्भातील संत्री उत्पादकांना उपयुक्त ठरणार आहे. प्रकल्प पूर्णपणे कार्यान्वित होऊन त्यातून उत्पादन सुरू होण्यास किमान चार-पाच वर्षे लागतील. सध्या काटोल तालुक्यातील झिल्पा, गोडन्नी, मोहगाव, जाटमांजरी या भागात संत्र्यांच्या लागवडीचे काम सुरू आहे. संत्र्यांची लागवड आणि पुढे त्यावर प्रक्रिया करण्यापर्यंतचा हा विदर्भातील एकमेव एकात्मिक प्रकल्प आहे. या प्रकल्पामुळे संत्री उत्पादकांचे अर्थकारण बदलण्यास नक्कीच मदत होईल, असे कंपनीचे म्हणणे आहे. 

प्रकल्प सुरू झाल्यानंतर संत्र्यांवर प्रक्रिया करून त्यापासून आइस्क्रीमचे फ्लेव्हर, सौंदर्य प्रसाधने, ज्यूस प्युरीज, बेकरी प्रॉडक्ट्स तयार केले जातील व ते परदेशात निर्यात केले जातील. त्यांची गुणवत्ताही त्यानुसारच ठेवली जाईल.
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search