Next
‘स्मार्टट्रॉन’कडून ‘टीबँड’चे अनावरण
प्रेस रिलीज
Thursday, May 17 | 04:01 PM
15 0 0
Share this story

मुंबई : ‘स्मार्टट्रॉन’ या भारतातील पहिल्या जागतिक तंत्रज्ञान ओईएम आणि प्रीमियम आयओटी ब्रँडने ‘टीबँड’ या आपल्या पहिल्या वेअरेबल डिव्हाइसच्या अनावरणाची घोषणा केली. इसीजी (इलेक्ट्रोकार्डिओग्राफी) आणि बीपी (रक्तदाब) मॉनिटरिंगसारख्या विशेष वैशिष्टयांचा समावेश असलेल्या या उपकरणातून युनिक फटिग आणि स्ट्रेस फॅक्टर मोजला जाईल. हा टीबँड १३ मेपासून चार हजार ९९९ रुपयांत फक्त फ्लिपकार्टवर उपलब्ध असेल. अनावरणाची ऑफर म्हणून टीबँडमध्ये सर्व खरेदीदारांना अतिरिक्त प्रीमियम लेदर स्ट्रॅपही दिला जाईल.

आजच्या काळात आरोग्य हा महत्त्वाचा आणि काळजीचा विषय ठरले आहेत. फक्त तंदुरूस्त राहणे नाही, तर मानसिक, शारीरिक आणि भावनिक आरोग्यात सुयोग्य ताळमेळ असेल अशाप्रकारे निरोगी राहणेही महत्त्वाचे आहे. त्यामुळे एक चांगले आरोग्य व्यवस्थापन व्यासपीठ असणे आवश्यक आहे. ‘स्मार्टट्रॉन’चा ‘टीबँड’ ‘थेल्थ’ अ‍ॅपसोबत येत असून, त्यामुळे वापरकर्त्याला एक सर्वांगीण आरोग्य इंडेक्स स्कोअर मिळतो. त्यात अ‍ॅक्टिव्हिटी ट्रॅकिंग, कॅलरी काऊंट, झोपण्याच्या पद्धती, ताण आणि थकव्याची पातळी, तसेच रक्तदाब आणि हृदयाचे आरोग्य यांचा समावेश आहे.

‘इसीजी’ आणि ‘बीपी’ तपासणीच्या वैशिष्टयांसोबतच, टीबँडमध्ये हार्ट रेट आणि रेस्टिंग हार्ट रेट सातत्याने मोजण्याची क्षमता आहे. कॅलरी बर्न, स्टेप्स आणि धावण्याचे अंतर, स्लीप ट्रॅकिंग अशा मूलभूत फिटनेस निकषांसोबत आलेल्या या ‘टीबँड’मधून स्लीप पॅटर्न आणि कार्यक्षमता तपासली जाते. त्यातून वापरकर्त्याला त्याच्या दिवसभरात झोपेतून उठण्यासाठी, औषधांची आठवण करून देण्यासाठी कस्टमाइज करण्यायोग्य अ‍ॅलर्ट, डीएनडी पर्याय, अकार्यरत आणि एसओएस अ‍ॅलर्ट, एसएमएस आणि कॉल नोटिफिकेशन्स दिले जातात.

‘टीबँड’चे उद्घाटन करताना ‘स्मार्टट्रॉन’चे अध्यक्ष आणि सहसंस्थापक रोहित राठी म्हणाले, ‘स्मार्टट्रॉनमध्ये आमचे लक्ष्य अद्ययावत तंत्रज्ञानाचा वापर करत उत्तम दर्जाची उत्पादने आणि आमच्या ग्राहकांना सेवा आणि उपाययोजनांचे वातावरण देणे हे आहे. टीबँडसोबतच इसीजी आणि बीपी मॉनिटरिंग यांच्यासारखी वर्गातील प्रथम असलेली वैशिष्टे आणली आहेत जी सर्वोत्तम दर्जाच्या उत्पादनांमध्येही उपलब्ध नाहीत. आम्हाला एक मजबूत ट्रॉनएक्स हेल्थ पोर्टफोलिओ तयार करायचा आहे आणि हे त्या दिशेने आम्ही टाकलेले पहिले पाऊल आहे. आम्हाला या अनावरणासोबत आरोग्याबाबतच्या चर्चा बदलण्याची आशा वाटते. हा टीबँड अशा लोकांसाठी बनवलेला आहे ज्यांना आपली अ‍ॅक्टिव्हिटी किंवा कॅलरीच मोजायची नाही, तर त्यांना एक सर्वांगीण आरोग्य निर्देशांक हवा आहे जो आमच्या हेल्थ इंडेक्सच्या माध्यमातून दर्शवला जातो. या टीबँडमध्ये ताशी एचआरएम, झोपण्यातील क्षमता, ताण आणि थकवा तपासणी अशा विविध वैशिष्टयांचा समावेश आहे, जे एका आरोग्यपूर्ण आयुष्यासाठी अत्यंत महत्त्वाचे घटक आहेत.’

‘या टीबँडमध्ये अत्यंत आकर्षक डिझाइन दिले जाते जे बदलण्यायोग्य घड्याळाच्या १८ मिमि आकारच्या स्ट्रॅपच्या पर्यायासोबत उपलब्ध आहे. त्यामुळे ती एक स्टायलिश अ‍ॅक्सेसरी झाली आहे. या टीबँडमध्ये एक आयपी६७ रेटिंग आहे. त्यामुळे ते धूळ आणि पाण्याला प्रतिबंधक ठरते. हा बँड आयओएस आणि अँड्रॉइड स्मार्टफोन्ससोबत सुयोग्य आहे आणि त्यात ओएलईडी डिस्प्ले, १००एमएएच ली बॅटरी आहे जी नोटिफिकेशन्स आणि वापर यांच्यावर आधारित सुमारे २-४ दिवस टिकते,’ अशी माहिती राठी यांनी दिली.

‘फ्लिपकार्ट’चे इलेक्ट्रॉनिक्स विभाग प्रमुख, वरिष्ठ संचालक हरी कुमार म्हणाले, ‘परिधान करण्यायोग्य उपकरणे हा सध्या भारतात ३.५ दशलक्षाचा उद्योग आहे आणि वार्षिक पातळीवर येथे मोठ्या प्रमाणावर वाढ झाल्याचे दिसते. आकारमानाच्या बाबतीत या उद्योगात ८० टक्क्यांपेक्षा अधिक योगदान दिले जाते आणि फक्त मूलभूत शरीर तपासणीचे ट्रॅकिंग आणि मॉनिटरिंग यांच्यापलीकडे जाऊन काम करणार्‍या स्मार्ट परिधानयोग्य उपकरणांमध्ये लोकांना स्वारस्य असल्याचे आम्हाला दिसते. इसीजी आणि बीपी मॉनिटरिंग यांच्यासारखी वर्गातील पहिली वैशिष्टे असलेल्या स्मार्टट्रॉन बँडसोबत आम्ही या वर्गवारीत विकास करून ग्राहकांना दर्जेदार उत्पादने नवीन आणि नाविन्यपूर्ण वैशिष्टयांसोबत करण्यासाठी उत्सुक आहोत. आम्हाला ‘स्मार्टट्रॉन’च्या नवीन वेअरेबल अनावरणासाठी खास भागीदारी करताना खूप आनंद झाला आहे आणि टीबँडसाठी ग्राहकांकडून खूप प्रतिसाद येईल, अशी आम्हाला आशा वाटते. आम्हाला या वर्गवारीमध्ये वाढीला खूप संधी असल्याचे दिसते आणि स्मार्टट्रॉनसोबत जवळून काम करून ही भागीदारी मजबूत करण्यासाठी आणि ग्राहकांना अनेक अनावरणाच्या ऑफर्ससह उत्तम दर्जाचा खरेदीचा अनुभव देण्यासाठी प्रयत्न करू.’

‘टीबँड हे स्मार्टट्रॉनचे ट्रॉनएक्स हेल्थ इकोसिस्टिम उभारण्याच्या दिशेने टाकलेले पहिले पाऊल आहे. या अनावरणासोबत स्मार्टट्रॉन अनेक हेल्थ भागीदारांना एकत्र आणून या उपकरणाभोवती विविध प्रकारच्या सेवा देण्यासाठी प्रयत्न करत आहे. यातील काही महत्त्वाच्या भागीदार ब्रँडमध्ये पोर्टिआ, तळवलकर्स, ग्रोफिटर, फीटअपार्ट, हेल्थसाइन्ज हे ब्रँड्स आहेत. स्मार्टट्रॉनकडून रूग्णालये, फार्मसी आणि डॉक्टरांच्या अपॉइंटमेंटसाठीही ही भागीदारी देण्यासाठी प्रयत्न केले जातील,’ असेही कुमार यांनी सांगितले.
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link