Next
शेअर्सची अधूनमधून विक्रीही आवश्यक...
BOI
Sunday, July 01, 2018 | 03:45 PM
15 0 0
Share this article:

जागतिक घडामोडी, भारतातील राजकीय वातावरण, पावसाळ्याची स्थिती, महागाई वाढ व रिझर्व्ह बँकेची द्वैमासिक धोरणे यावर शेअर्सच्या किंमती खालीवर होत असतात. हे ध्यानात ठेवायला हवे. त्यामुळे एकदम एकमुठी गुंतवणूक न करता ती टप्प्याटप्प्याने हवी. तसेच वर्षभर अधूनमधून खरेदीप्रमाणे विक्री करून नफाही पदरात पाडून घ्यायला हवा. सध्याच्या स्थितीबद्दल जाणून घेऊ या ‘समृद्धीची वाट’ सदरात...
.............
गेल्या आठवड्यात शेअर बाजारात सकारात्मक वातावरण होते. गुरुवारी, २८ जूनला जून महिन्याच्या वायदेबाजाराची पूर्ती झाली. शुक्रवारी सेन्सेक्स ३५ हजार ४२६ अंकांवर, तर निफ्टी १० हजार ७१४ अंकांवर थांबला. गृहवित्त व ग्राफाइट कंपन्यांचे शेअर्स चढे होते. दिवाण हाउसिंग फायनान्स ६३७ रुपये, इंडियाबुल्स हाउसिंग फायनान्स ११४२ रुपये, हेग ३१० रुपये व ग्राफाइट इंडिया ८४० रुपये असे भाव होते.

गेल्या आठवड्यात रुपयाचा डॉलरशी विनिमय दर ६९ रुपयांवर गेला; पण अन्य उभरत्या राष्ट्रांच्या तुलनेत रुपया कमी घसरला आहे. रुपया गेल्या पाच वर्षांत (मार्च २०१३पासून) फक्त २५ टक्के घसरला आहे. इंडोनेशियाचा रुपैय्या ४६ टक्के घसरला, रशियाचा रुबल १०७ टक्के, तर दक्षिण आफ्रिकेचा रँड ६३ टक्के घसरला. ब्राझीलच्या चलनाचे ८६ टक्के अवमूल्यन झाले, तर मेक्सिकन पेसो ५७ टक्के घसरला.

यंदाच्या (२०१८) पहिल्या सहा महिन्यांत टाटा कन्सल्टसीचा शेअर ३६ टक्क्यांनी वर गेला. बजाज फायनान्सचा शेअर ३३ टक्के चढला, इन्फोसिसचा शेअर २२ टक्क्यांनी वधारला. वर्षभरात गोदरेज कन्झ्युमर, नेस्ले, बजाज फिनसर्व्ह, ज्युबिलंट फूड, ब्रिटानिया, पेज इंडस्ट्रीज यांच्या शेअरचे भाव चांगले वाढले.

सध्याच्या भावात ग्राफाइट इंडिया व हेग घेण्यासारखे आहेत. वर्षभरात त्यात ३५ टक्के वाढ होईल. दिवाण हाउसिंग फायनान्सचा शेअरही ६४० रुपयांवरून ७६० रुपयांपर्यंत जाईल, तर इंडियाबुल्स हाउसिंगचा शेअर ११६० रुपयांवरून १५६० रुपयांपर्यंत उडी घेईल. कंपन्यांच्या २०१८-१९ वर्षाच्या संभाव्य कामगिरीवर हे अंदाज बेतलेले आहेत. जागतिक घडामोडी, भारतातील राजकीय वातावरण, पावसाळ्याची स्थिती, महागाई वाढ व रिझर्व्ह बँकेची द्वैमासिक धोरणे यावर शेअर्सच्या किंमती खालीवर होत असतात. हे ध्यानात ठेवायला हवे. त्यामुळे एकदम एकमुठी गुंतवणूक न करता ती टप्प्याटप्प्याने हवी. तसेच वर्षभर अधूनमधून खरेदीप्रमाणे विक्री करून नफाही पदरात पाडून घ्यायला हवा.

सध्या नॉन बँकिंग फायनान्स कंपन्या जोरात आहेत. बजाज फायनान्स, मुथूट फायनान्स, मणप्पुरम फायनान्स, महिंद्र अँड महिंद्र फायनान्स, श्रीराम ट्रान्सपोर्ट फायनान्स, चोलामंडलम इन्व्हेस्टमेंट अँड फायनान्स यांपैकी कुठेही गुंतवणूक केली, तर वर्षभरात २५ टक्के नफा मिळून जाईल. विक्रीसाठी दिवाळी ते नाताळपर्यंत थांबायला हवे. 

इंडियाबुल्स हाउसिंग कंपनीचे मार्च २०१९ व मार्च २०२०चे आकडे खालीलप्रमाणे असतील. (कोटी रुपयांत) 


- डॉ. वसंत पटवर्धन   
(लेखक ‘बँक ऑफ महाराष्ट्र’चे माजी अध्यक्ष आहेत.)

(शेअर बाजार, तसेच म्युच्युअल फंडातील गुंतवणूक जोखीमपूर्ण आहे. ‘समृद्धीची वाट’ या सदराचा उद्देश वाचकांना गुंतवणुकीसंदर्भातील अशा विविध बाबींची माहिती करून देऊन दिशा दाखवणे हा आहे. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करताना वाचकांनी स्वतःच्या जबाबदारीवरच करावी. त्यासाठी ‘बाइट्स ऑफ इंडिया’ कोणत्याही प्रकारे जबाबदार नसेल. वाचकांनी गुंतवणुकीसंदर्भातील आपल्या शंका, प्रश्न article@bytesofindia.com या ई-मेलवर पाठवावेत. निवडक प्रश्नांना या सदरातून उत्तरे दिली जातील. हे सदर दर शनिवारी आणि रविवारी प्रसिद्ध होते. त्यातील लेख एकत्रितरीत्या https://goo.gl/Vb1kM6 या लिंकवर उपलब्ध आहेत.)
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search