Next
येत्या रविवारी सोडवा ‘यक्षप्रश्न’
BOI
Friday, February 02 | 05:05 PM
15 0 0
Share this story

पुणे : भाषेच्या संवर्धनासाठी प्रयत्न करणाऱ्या पुण्यातील भाषा फाउंडेशनच्या वतीने यंदाही शालेय विद्यार्थ्यांसाठी ‘यक्षप्रश्न’ या प्रश्नमंजूषेचे आयोजन करण्यात आले आहे. या माध्यमातून मुलांची भाषिक क्षमता वाढवण्यासाठी प्रयत्न केले जातात, अशी माहिती संस्थेच्या संस्थापक अध्यक्षा स्वाती राजे यांनी दिली आहे. 

येत्या रविवारी म्हणजेच चार फेब्रुवारीला ही स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. राज्य स्तरावर आयोजित करण्यात येणाऱ्या ‘यक्षप्रश्न’चे हे सातवे वर्ष आहे. शहरी आणि ग्रामीण अशा दोन्ही भागांतील विद्यार्थी यात सहभागी होतात. या स्पर्धेला विद्यार्थ्यांचा प्रचंड प्रतिसाद मिळतो. दर वर्षी यामध्ये सहभागी होणाऱ्या विद्यार्थ्यांच्या संख्येत वाढ होताना दिसत आहे.  

स्वाती राजे‘यक्षप्रश्न’ या स्पर्धेत महाराष्ट्राच्या विविध भागांतून शालेय स्तरावरील विद्यार्थी सहभागी होतात. सहभागी विद्यार्थ्यांना दर वर्षी एक नवीन विषय ‘थीम’ म्हणून जून-जुलैमध्ये दिला जातो. यावर मुलांनी पाच-सहा महिने तयारी करणे अपेक्षित असते. आजवर ‘नो युवर क्लासिक्स’, ‘इंडियन मायथॉलॉजी’, ‘स्टोरीज ऑफ अवर हिरोज’, तसेच ‘राजा राणीच्या गोष्टी’, ‘कहाणी धरित्रीची’, ‘गोष्टी गावांच्या’ असे काही विषय देण्यात आले होते. यंदा ‘आपले खेळ आपले खेळाडू’ असा विषय देण्यात आला आहे. इंग्रजी आणि मराठी अशा दोन्हीही भाषांमध्ये ही प्रश्नमंजूषा घेतली जाते. 

या कार्यक्रमासाठी विनामूल्य प्रवेश असतो. शिवाय बाहेरून येणाऱ्या विद्यार्थ्यांची राहण्याची व इतर व्यवस्था संस्थेमार्फत केली जाते. प्रेक्षकांचाही या स्पर्धेत समावेश असतो. यशस्वी विद्यार्थ्यांबरोबरच प्रेक्षकांनाही पारितोषिके दिली जातात. प्रश्नमंजूषेच्या क्षेत्रातली नावाजलेली संस्था असलेल्या ‘क्विझकॉर्प’मार्फत या कार्यक्रमाच्या व्यवस्थापनाचे काम पाहिले जाते.    

प्रादेशिक भाषांचे जतन आणि संवर्धनासाठी २००८मध्ये ‘भाषा फाउंडेशन’ ही संस्था सुरू करण्यात आली. या संस्थेमार्फत विविध प्रकारचे उपक्रम आणि प्रकल्प राबवले जातात. हे करत असताना लहान किंवा शालेय मुलांसाठी विशेष काम केले जाते. मुलांची भाषिक क्षमता वाढवण्यासाठी राबवल्या जाणाऱ्या महत्त्वाच्या उपक्रमांपैकी एक म्हणजे ही ‘यक्षप्रश्न’ स्पर्धा होय. 

स्पर्धेविषयी : 
दिवस : रविवार, चार फेब्रुवारी २०१८
वेळ : सकाळी साडेसात ते दुपारी तीन.
स्थळ : भारतीय विद्याभवन, सुलोचना नातू, महादेव नातू सभागृह, सेनापती बापट रस्ता, केटरिंग इन्स्टिट्यूटशेजारी, मॉडेल कॉलनी, शिवाजी नगर, पुणे. 

(भाषा संस्थेच्या संस्थापिका स्वाती राजे यांनी कार्यक्रमासंदर्भात दिलेल्या माहितीचा व्हिडिओ सोबत दिला आहे.)

 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
  Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link