Next
माझी प्रवासगंगा
BOI
Monday, February 04, 2019 | 10:47 AM
15 0 0
Share this article:

प्रवास करणे अनेकांना आवडते. त्यातही सहलीला जाण्यातील गंमत वेगळीच असते. देशांतर्गत व परदेशातील पर्यटनाला सध्या चांगले दिवस आहेत. दोन- चार दिवसांच्या सुटीतही ‘छोटा ब्रेक’ घेता येतो. पर्यटनाला गेल्यावर खास करून परदेश असेल, तर तेथे काय पाहावे या माहितीसह. त्या ठिकाणची ऐतिहासिक, भौगोलिक माहिती, संबंधित देशांची निगडीत आठवणी याचे वर्णन व प्रवासानुभव सतीश गुप्ते यांनी ‘माझी प्रवासगंगा’मधून कथन केला आहे.

चारी बाजूंनी शत्रू राष्ट्रांनी घेरलेला चिमुकला इस्राइलची  यशोगाथा यात आहे. हजारो वर्षांचा इतिहास असलेला जॉर्डन व पेट्रा शहर, प्राचीन वैभवशाली संस्कृती व पिरॅमिड्सचा वारसा असलेला इजिप्त या हटके देशांचे वर्णन यात आहे. त्याशिवाय नेपाळ, हाँककाँग, शेंजन, मकाऊ हे भारताजवळील देश, अमेरिका, युरोपसह फिनलंड, स्वीडन, नॉर्व, डेन्मार्कची सफरही यातून घडते. भारताचा मित्र देश असलेल्या रशियात वाचकांना फिरवून आणले आहे. प्रवासवर्णनासह विमानतळ, विमानप्रवास, हॉटेलमधील वास्तव्य आणि संपूर्ण प्रवासासंबंधी उपयुक्त सूचनाही लेखकाने दिल्या आहेत.

पुस्तक : माझी प्रवासगंगा
लेखक : सतीश गुप्ते
प्रकाशक : सतीश गुप्ते
पाने : १४७
किंमत : २५० रुपये

(हे पुस्तक ‘बुकगंगा डॉट कॉम’वरून घरपोच मागवण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.)

 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search