Next
शाळासिद्धी मानांकनासाठी अत्यल्प प्रतिसाद!
BOI
Friday, March 03, 2017 | 12:02 PM
15 0 0
Share this article:

पुणे : राज्य सरकारने राज्यातील पहिली ते बारावीच्या सर्व शाळांना शाळासिद्धी मानांकनासाठी नोंदणी करणे बंधनकारक केले होते, असे असताना एकूण शाळांच्या निम्म्यापेक्षा अधिक शाळांनी मानांकन नोंदणीसाठी पाठ फिरवली आहे. या प्रक्रियेतून शाळेच्या गुणवत्ता दर्जाची खरी माहिती समोर येईल, या धास्तीपोटी शाळासिद्धी नोंदणीकडे शाळांनी पाठ फिरवली आहे. त्यामुळे या शाळांची नोंदणी कधी होणार आणि नोंदणी न करणाऱ्या शाळांनावर कोणतीही कारवाई केली जाईल, असा प्रश्न शिक्षण वर्तुळात विचारला जात आहे. गेल्या काही वर्षांपासून जिल्हा परिषद शाळांबरोबर इतरही शाळांच्या गुणवत्तेत भर पडावी यासाठी राज्यातील सर्व प्राथमिक, माध्यमिक, शाळांचे मुल्यांकन व प्रमाणीकरण करण्याचा प्रयत्न शाळासिद्धी उपक्रमाच्या माध्यामतून करण्यात येत आहे. या माध्यमातून अनेक शाळांचे शैक्षणिक गुणवत्तेचे वास्तव समोर येणार आहे. मात्र, हे वास्तव समोर येऊ नये, यासाठी राज्यातील निम्म्यापेक्षा जास्त शाळांनी या नोंदणीकडे दुर्लक्ष केले आहे. 

राज्यातील निम्म्यापेक्षा जास्त शाळांनी या नोंदणीकडे दुर्लक्ष केले आहे. शाळा मानांकन नोंदणीसाठी अंतिम तारीख २८ फेब्रवारी होती. या निर्धारित वेळेत राज्यातील ३६ जिल्ह्यांमधील एक लाख नऊ हजार ३४७ शाळांपैकी केवळ ५० हजार ७७६ शाळांनीच दिलेल्या कालवधीत नोंदणी पूर्ण केली. वेबसाइटवरच्या या आकडेवारीहून निम्म्यापेक्षा जास्त शाळांनी मानांकनासाठी नोंदणी केली नसल्याचे स्पष्ट झाले. या उर्वरित सर्व शाळांकडून येत्या १५ मार्चपर्यंत कोणत्याही परिस्थितीत नोंदणीपूर्ण करून घेण्यात येईल. त्यासाठी जिल्हास्तर व तालुका स्तरावर एका झोनल ऑफिसरची नियुक्ती करण्यात आली आहे, अशी माहिती प्रशासनातर्फ देण्यात आली.
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search