Next
महाराष्ट्रीयन पदार्थांच्या लोकप्रियतेसाठी ‘अंगतपंगत’
मराठी शेफ मधुरा बाचल यांचा पुढाकार; सुगरणींच्या शंभर मिसळींची मेजवानी
BOI
Saturday, May 25, 2019 | 04:38 PM
15 0 0
Share this article:


पुणे : दाक्षिणात्य, पंजाबी, चायनीज आणि फास्ट फूडच्या जमान्यात महाराष्ट्रीयन पदार्थांना म्हणावी तशी प्रसिद्धी मिळत नाही. अशावेळी स्वादिष्ट, पोषक महाराष्ट्रीय पदार्थ सगळीकडे उपलब्ध व्हावेत, या हेतूने प्रसिद्ध मराठी शेफ मधुरा बाचल यांच्या पुढाकारातून ‘अंगतपंगत दिवस’ हा अनोखा उपक्रम राबविला जात आहे. याच निमित्ताने शुक्रवारी, २४ मे रोजी पुण्यातील कुमार पॅसिफिक मॉलमधील ‘इन-ग्रीन’ हॉटेलमध्ये ‘अंगतपंगत दिवस’ साजरा झाला. मधुरा बाचल यांच्या चाहत्या असलेल्या शंभरपेक्षा अधिक सुगरणींनी खास मिसळीचा बेत बनवला होता. 

अंगतपंगत उपक्रमात सहभागी झालेल्या महिलांशी संवाद साधताना मधुरा बाचल

या सर्वांनी एकत्र येत पंगत केली आणि एकमेकांच्या मिसळीचा स्वाद अनुभवला. जोडीला मधुरासोबत सेल्फी आणि त्यांच्या खमंग टिप्समुळे पुणेकर सुगरणींची अंगतपंगत चांगलीच रंगली. ‘मधुराज रेसिपी’च्या मधुरा बाचल आणि ‘क्यूकी अॅंड्स’ यांनी संयुक्तपणे या अंगतपंगत उपक्रमाचे आयोजन केले होते. विविध प्रकारच्या मिसळ तयार करण्यासाठी सुगरणींनी हॉटेलच्या किचनमध्ये गर्दी केली होती. या मिसळींमध्ये मधुरा यांनी बनवलेल्या विशेष मसाल्यांचा वापर करण्यात आला होता. तोंडाला पाणी आणणाऱ्या या शंभर मिसळींचे प्रदर्शनही मांडण्यात आले होते. 

‘महाराष्ट्रातील मराठवाडा, खान्देशी, वैदर्भीय, कोकणी, पुणेरी, कोल्हापुरी अशा वैशिष्ट्यांचे हजारो पदार्थ आहेत. त्यांची चव सगळीकडे उपलब्ध व्हावी, याकरिता या पदार्थांना प्रसिद्धी आणि प्रोत्साहन मिळणे गरजेचे आहे. यासाठीच हा ‘अंगतपंगत’ उपक्रम राबवत आहे,’ असे मधुरा यांनी नमूद केले. त्या पुढे म्हणाल्या, ‘पाककला हा माझ्या अगदी मनाला भावणारा विषय आहे. त्याच्याच प्रेमातून हे मसाले बनले आहेत. मिसळ हा पदार्थ अतिशय चटकदार आहे. महाराष्ट्रातील आणि महाराष्ट्राबाहेरील अनेक हॉटेलांमध्ये महाराष्ट्रीयन खाद्यपदार्थ उपलब्ध करुन देण्याबाबत आम्ही प्रयत्न करीत आहोत.’ 


क्युकी अॅड्सचे व्यवस्थापकीय संचालक समीर बांगरा म्हणाले, ‘मधुरा बाचल अतिशय हुशार आणि उत्साही शेफ आहे. पारंपरिक आणि आधुनिकतेचा मेळ घालत तिच्या चाहत्यांना पिढ्यानपिढ्या लक्षात राहतील अशा रेसीपीज तिला बनवायच्या आहेत. अंगतपंगत हा अतिशय नाविन्यपूर्ण उपक्रम असून, त्याला मिळालेला प्रतिसाद उत्साहवर्धक आहे.’

(‘मधुराज रेसिपी’ हे पुस्तक ‘बुकगंगा डॉट कॉम’वरून घरपोच मागवण्यासाठी येथे क्लिक करा.)
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.
COMMENTS
BDGramopadhye About 111 Days ago
Nice idea . How large was the response from non- Marathi people ? Was it well-advertised ? One has to keep trying . It is a good idea . And why only in Pune ? How about Nagapur , Indor , Nanded , :Dhule and such places
0
0

Select Language
Share Link
 
Search