Next
‘यूके’मध्ये मराठी मनोरंजनविश्वाचे दालन
प्रेस रिलीज
Wednesday, October 25, 2017 | 04:43 PM
15 0 0
Share this article:पुणे/मुंबई :
युनायटेड किंगडम (यूके) मधील मराठी रसिकांसाठी भारतीय आणि खासकरून मराठी मनोरंजन विश्वातील विविध प्रयोग करण्यासाठी ‘बाराखडी एंटरटेनमेंटस्’ने पुढाकार घेतला असून १२ नोव्हेंबरला ‘चला हवा येऊ द्या’ टीम लंडनमध्ये खास शो करणार आहे.

लंडनमधील ‘बाराखडी एंटरटेनमेंटस्’चे संचालक अमोघ धामणकर, गंधार बाबरे यांनी ही माहिती दिली.

लंडनमध्ये ‘ट्रॉक्सी थिएटर’मध्ये हा खास शो होत असून, ‘झी मराठी’ची गाजलेली टीम तिथे शो साठी जात आहे.

अमोघ धामणकरअमोघ धामणकर आणि गंधार बाबरे या चित्रपटवेड्या दोन अभियंता मराठी तरुणांनी मनोरंजन विश्वातील चांगले प्रयोग, उपक्रम ‘यूके’वासियांना दाखवायच्या उद्देशाने ‘बाराखडी एंटरटेनमेंटस्’ची स्थापना केली. २०१६ मध्ये ‘एक अलबेला’ हा मराठी सिनेमा त्यांनी इंग्लंडमधील २५ ठिकाणी प्रदर्शित केला आाणि त्याचे ७५ शो झाले. ‘ब्रिटिश फिल्म सर्टीफिकेशन बोर्ड’कडून प्रमाणित होऊन प्रदर्शित होणारा हा पहिला मराठी चित्रपट ठरला. अशा तर्‍हेने ब्रिटिश टेरीटरी मराठी सिनेमाला ‘बाराखडी’च्या माध्यमातून खुली झाली.

नोव्हेंबर २०१६ मध्ये त्यांनी ‘लई बाराचे’ हा कार्यक्रम चार ठिकाणी केला. त्यात कुशल बद्रिके, भाऊ कदम, मंगेश देसाई, संतोष जुवेकर, विजू माने यांचा समावेश होता. ‘स्ट्रगलर साला’ या कॉमेडी शोच्या चित्रीकरणात त्यांनी लंडनमध्ये मदत केली.

या पार्श्वभूमीवर ‘चला हवा येऊ द्या’ चा खास प्रयोग १२ नोव्हेंबरला ‘ट्रॉक्सी थिएटर’मध्ये होत आहे. ‘चला हवा येऊ द्या’चे डॉ. नीलेश साबळे, भाऊ कदम, कुशल बद्रिके, श्रेया बुगडे, सागर कारंडे, भारत गणेशपुरे हे कलावंत लंडनमधील शोमध्ये सहभागी होणार आहेत. ‘ट्रॉक्सी’ हे प्रख्यात थिएटर असून, तेथे यापूर्वी डॅनी बॉयल (स्लम डॉग मिलेनियर), रिचर्ड ब्रॅनसन (व्हर्जिन ग्रुप) अशा दिग्गजांनी शो केले आहेत.

गंधार बाबरे‘चला हवा येऊ द्या’च्या लंडन शोसाठी  ‘झी मराठी’, ‘वीणा वर्ल्ड’, ‘रॅपचिक’, रोटीमॅटीक, नक्षी डॉट कॉम यांचे सहकार्य   लाभत आहे.  

‘मराठी चित्रपट, नाटक, मनोरंजन विश्वाला ‘यूके’मध्ये चांगले व्यासपीठ मिळवून देणे हा ‘बाराखडी एंटरटेनमेंट’च्या स्थापनेमागचा उद्देश आहे,’ असे अमोघ धामणकर, गंधार बाबरे यांनी सांगितले. नाटक, स्टेज शो, चित्रीकरण, टीव्ही शो, पारितोषिक वितरण सोहळे अशा सर्व गोष्टींसाठी हे व्यासपीठ ते उपलब्ध करून देणार आहेत.

‘इंग्लंड, वेल्स्, स्कॉटलंड, नॉर्दर्न आयर्लंड (यूके) येथे साधारण १o हजार इतके मराठी रसिक राहतात. त्यांच्यापर्यंत विविध उपक्रमाद्वारे पोहोचण्याचा आमचा प्रयत्न आहे,’ असेही त्यांनी सांगितले

अधिक माहितीसाठी :

वेबसाईट : www.barakhadi.co.uk
फेसबुक पेज : Barakhadi Entertainments
ट्विटर : BarakhadiUk
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search