Next
‘क्रेडाई महाराष्ट्र’च्या अध्यक्षपदी राजीव परीख
प्रेस रिलीज
Tuesday, April 02, 2019 | 03:17 PM
15 0 0
Share this article:

नवनियुक्त अध्यक्ष राजीव परीख (डावीकडे) यांना मेमोरेंडम देताना शांतीलाल कटारिया.

पुणे : ‘क्रेडाई महाराष्ट्र’ची निवडणूक पुण्यातील कॉनरॅड हॉटेल येथे नुकतीच झाली. यात ‘क्रेडाई महाराष्ट्र’च्या अध्यक्षपदी कोल्हापूरचे राजीव परीख यांची बिनविरोध निवड करण्यात आली. सर्व सभासदांनी एकमताने परीख यांची दोन वर्षांच्या कालावधीसाठी निवड केली. एक एप्रिलपासून त्यांनी पदभार स्वीकारला.

या वेळी ‘क्रेडाई नॅशनल’चे चेअरमन गीतांबर आनंद, क्रेडाई नॅशनलचे प्रेसिडेंट इलेक्ट सतीश मगर, क्रेडाई नॅशनलचे अध्यक्ष जक्षय शहा, ‘क्रेडाई महाराष्ट्र’चे अध्यक्ष शांतीलाल कटारिया तसेच ५१ शहरांतील अनेक सदस्य उपस्थित होते.

२०१९-२१ या कालावधीसाठी ‘क्रेडाई महाराष्ट्र’च्या उपाध्यक्ष पदांच्याही निवडणुका या दिवशी झाल्या. या वेळी संघटनेची नवी राज्य कार्यकारिणी जाहीर करण्यात आली. त्यात सुनील फुरडे (सोलापूर), महेश साधवानी (नागपूर), रसिक चौहान (नवी मुंबई), श्रीकांत परांजपे (पुणे), प्रफुल्ल तावरे (बारामती), रवी वट्मवार (औरंगाबाद) यांची उपाध्यक्षपदी निवड झाली. सुनील कोतवाल (नाशिक) यांची सचिवपदी, तर गिरीश रायबागे (कोल्हापूर) यांची खजिनदारपदी नेमणूक करण्यात आली. संयुक्त सचिवपदी अनिश शाह (जळगाव), महेश यादव (कोल्हापूर), दीपक मोदी (माळेगाव), विकास लागू (सांगली), राज्य सल्लागार समितीच्या अध्यक्षपदी  शैलेश वानखेडे (अमरावती) यांची नियुक्ती करण्यात आली.

उपस्थितांशी संवाद साधताना राजीव परीख

‘बांधकाम व्यवसायात अधिकाधिक सुशासन, सुसूत्रता, झिरो डीले पॉलिसी, आधुनिक बांधकाम तंत्रज्ञानाचा उपयोग करून बांधकाम खर्च कमी करून नफा कसा वाढवता येईल यासर्व बाबींवर प्रामुख्याने लक्ष देण्यात येईल. याशिवाय प्लॉटिंग डेव्हपमेंट, स्कील डेव्हपमेंट, करविषयक सुधारणा यांसारख्या मुद्द्यांवरदेखील जास्तीत जास्त मार्गदर्शन विकसकांना मिळावे,’ असा मानस असल्याची भावना परीख यांनी व्यक्त केली.

‘क्रेडाई नॅशनल’चे चेअरमन गीतांबर आनंद यांच्या हस्ते ‘क्रेडाई महाराष्ट्रा’च्या नवीन ऑफिसचे उद्घाटन झाले. या वेळी ‘क्रेडाई नॅशनल’चे अध्यक्ष जक्षय शहा, ‘क्रेडाई नॅशनल’चे प्रेसिडेंट इलेक्ट मगर, ‘क्रेडाई महाराष्ट्र’चे अध्यक्ष कटारिया उपस्थित होते.

‘बांधकाम व्यवसायाशी निगडित सर्व महत्त्वाची ऑफिसेस पुण्यातच असल्यामुळे पुण्यासारख्या मध्यवर्ती ठिकाणी ‘क्रेडाई महाराष्ट्र’चे ऑफिस होणे आवश्यक होते. हीच गरज लक्ष्यात घेऊन कँपमधील न्यूक्लियस जीजीभाय टॉवरच्या सहाव्या मजल्यावर हे ऑफिस घेण्यात आले. एकता हीच ‘क्रेडाई’ची सर्वांत मोठी ताकद आहे,’ असे मत गीतांबर आनंद यांनी व्यक्त केले.
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search