Next
‘मधुरा आणि मी वेगळी नाहीच’
प्रेस रिलीज
Monday, June 18, 2018 | 04:16 PM
15 0 0
Share this article:

‘स्टार प्रवाह’वर १८ जूनपासून सुरु होणाऱ्या ‘छत्रीवाली’ या मालिकेतून नम्रता प्रधान हा नवा चेहरा छोट्या पडद्यावर दाखल झाला आहे. साधेपणात सौंदर्य शोधणाऱ्या आणि स्वत:सोबत नेहमी छत्री बाळगणाऱ्या मधुराची व्यक्तिरेखा नम्रता साकारत आहे. या मालिकेच्या निमित्ताने नम्रताशी साधलेला संवाद...
...................................................................
‘छत्रीवाली’ ही तुझी पहिलीच मालिका. या मालिकेसाठी तुझी निवड कशी झाली?
-
लहानपणापासूनच मला अभिनयाची आवड आहे. या मालिकेसाठी ऑडिशन सुरु असल्याचे मला समजले आणि मी ऑडिशनसाठी फोटो पाठवले होते. त्यात माझी निवड झाल्यानंतर दोनवेळा लूक टेस्ट झाली. तो लूक योग्य वाटला सगळ्यांना आणि अपेक्षित असणारी ‘छत्रीवाली’ त्यांना माझ्यात सापडली. ‘छत्रीवाली’मुळे माझे अभिनयाचे स्वप्न पूर्ण होत आहे, असेच म्हणावे लागेल.

मालिकेतली मधुरा आणि तुझ्या व्यक्तिमत्त्वात काही साम्य आहे? ही व्यक्तिरेखा साकारताा अभिनेत्री म्हणून काय विचार करतेस?
-
आमच्यात खूपच साम्य आहे. मधुरा आणि मी जवळपास सारख्याच आहोत असेही म्हणता येईल. कारण, मी माझ्या कुटुंबाशी खूप घट्ट आहे. मधुरा कोणताही निर्णय विचार करून घेते, तसेच मासेही आहे. मधुरा जितकी कॉन्फिडंट आहे, तशीच मीही आहे. त्यामुळे माझ्यासाठी मधुरा वेगळी नाहीच. ही व्यक्तिरेखा साकारताना मला वेगळे असे काहीच करावे लागत नाही.

या मालिकेत तुझ्याबरोबर अनुभवी कलाकार आहेत. या सगळ्यांबरोबर काम करण्याचा अनुभव कसा आहे?
-
खूपच मस्त... आम्ही सगळे सेटवर खूप मजा करतो. त्यामुळे सेटवरचे वातावरण छान राहाते. सगळेजण ते वातावरण एंजॉय करतात. सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे आम्ही प्रत्येक सीनची रिहर्सल करतो. त्यामुळे सीन करताना सोपे जाते. त्याशिवाय सगळे सिनिअर्स मला सांभाळून घेतात, मी चुकत असेन, तर सांगतात. त्यामुळे मलाही दडपण येत नाही. आता या सगळ्यांबरोबर माझी छान केमिस्ट्री तयार होतेय.

‘स्टार प्रवाह’ने आजपर्यंत अनेक नव्या कलाकारांना संधी दिली. त्यात आता तुझेही नाव आले आहे. कसे वाटते आहे?
-
‘स्टार प्रवाह’च्या मालिकेतून माझे पदार्पण होणे हे माझे भाग्य आहे. अनेक कलाकारांचे करिअर ‘स्टार प्रवाह’वरच सुरू झाले होते. ‘स्टार प्रवाह’ची क्रिएटिव्ह टीम, आमचे निर्माते, दिग्दर्शक सगळ्यांशीच माझे छान नाते झाले आहे.

मधुराचे आणि छत्रीचे एक नाते आहे. तुझ्यासाठी छत्री किती खास आहे?
-
मला स्वतःला छत्री आवडतेच. पावसाळ्यात छत्री सोबत असणे खूप महत्त्वाचे असतेच; पण मी उन्हाळ्यातही छत्री वापरते. मालिकेच्या निमित्ताने आता दररोज छत्री माझ्यासोबत आहे. त्यामुळे छत्री माझ्या आयुष्याचा अविभाज्य भागच झालीय.
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search