Next
‘मायव्होडाफोन अॅप’द्वारे ‘आयपॅड मिनी’ जिंकण्याची संधी
प्रेस रिलीज
Wednesday, June 13, 2018 | 03:18 PM
15 0 0
Share this article:

मुंबई : फुटबॉलचा ज्वर सर्व क्रीडाप्रेमींवर चढलेला असतानाचा ‘व्होडाफोन इंडिया’तर्फे ‘मायव्होडाफोन अॅप’मधून एक साधा गेम खेळून ग्राहकांना ‘आयपॅड मिनी’ जिंकण्याची संधी उपलब्ध करून दिली आहे.

‘मायव्होडाफोन अॅप’मधील वैशिष्ट्यांमुळे, ‘फिफा’च्या फुटबॉल सामन्यांचा वेगळाच आनंद ‘व्होडाफोन’च्या ‘टेक्नोसॅव्ही’ ग्राहकांना मिळेल, अशी ‘व्होडाफोन इंडिया’ने व्यवस्था केली आहे. ११ जून ते १५ जुलै या ३४ दिवसांच्या कालावधीत ‘व्होडाफोन’ची स्पर्धा होत आहे. तिच्यात बंपर बक्षिस जिंकणाऱ्यांना एक लाखाचे ‘ट्रॅव्हल व्हाऊचर’ मिळणार आहे. ​

‘व्होडाफोन’च्या पोस्टपेड व प्रीपेड ग्राहकांना सर्व सेवा मोबाईलवर अगदी एका क्लिकवर, त्यांच्या सोयीनुसार मिळाव्यात यासाठी ‘माय व्होडाफोन’ हे अॅप विशेष प्रकारे बनविण्यात आले आहे. ‘नेव्हिगेशन’ करण्यास सोपे असलेल्या व स्मार्ट विश्लेषण करणाऱ्या या ‘अॅप’मधून प्रत्येक ग्राहकाला त्याच्या मोबाईल वापराचे, त्या-त्या वेळेचे संपूर्ण तपशील मिळतात; तसेच एकापेक्षा अधिक कनेक्शन्स असल्यास ते हाताळणे, बिलाचे पेमेंट, रिचार्ज करणे, नवीन उत्पादनांची उपलब्धता आणि ‘मोबाईल नंबर पोर्टेबिलिटी’ची विनंती करणे, आदी सुविधा या ‘अॅप’मध्ये देण्यात आल्या आहेत. ग्राहकांना त्यांच्या वापरास अनुरूप असा ‘बेस्ट प्लॅन’ सुचविण्याचे कामही हे अॅप करते.

(Please click here to read this news in English.)
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search