Next
‘व्होडाफोन’, ‘फ्लिपकार्ट’तर्फे ९९९ रुपयांत स्मार्टफोन
प्रेस रिलीज
Saturday, January 27, 2018 | 02:40 PM
15 0 0
Share this story

मुंबई : प्राथमिक स्तरावरील विविध प्रकारांतील स्मार्टफोन, ग्राहकांना केवळ ९९९ रुपयांत उपलब्ध करून देण्यासाठी भारतातील आघाडीची दूरसंचार सेवा पुरवठादार कंपनी व्होडाफोन आणि आघाडीची ई-कॉमर्स कंपनी फ्लिपकार्टने भागीदारी करत असल्याचे जाहीर केले.

या भागीदारीअंतर्गत व्होडाफोनने फ्लिपकार्टच्या #MyFirst4GSmartphone या मोहिमेतील प्राथमिक स्तरावरील निवडक फोर-जी स्मार्टफोन मॉडेल्सवर काही उत्साहवर्धक रोख परतावा योजना लागू केली आहे.

सध्याच्या किंवा नव्या व्होडाफोन प्रीपेड ग्राहकांना फ्लिपकार्टवर उपलब्ध असलेल्या प्राथमिक स्तरावरील पात्र स्मार्टफोनच्या खरेदीवर रोख परतावा मिळेल. ही विशेष योजना घेण्यासाठी ग्राहकांना ३६ महिन्यांसाठी दरमहा किमान १५० रुपयांचा रिचार्ज करावा लागेल. (प्रत्येक महिन्यात एकूण १५० रुपयांचे रिचार्ज होईल, अशा पद्धतीने एका वेळी कोणत्याही किंमतीचे रिचार्ज करता येतील.)ग्राहकांना पहिल्या १८ महिन्यांनंतर ९०० रुपये, तर आणखी १८ महिन्यांनंतर एक हजार १०० रुपये, असा एकूण दोन हजार रुपये रोख परतावा मिळेल. हा परतावा ग्राहकांच्या एम-पेसा वॉलेटमध्ये जमा होईल. या वॉलेटद्वारे ग्राहकांना त्यांच्या सोयीने डिजिटल व्यवहार करणे किंवा रोख रक्कम काढणे शक्य आहे.

व्होडाफोन इंडियाचे ग्राहक व्यवसाय विभागाचे सहयोगी संचालक अवनीश खोसला म्हणाले, ‘फ्लिपकार्टबरोबर भागीदारी करताना आणि त्याचा लाभ आमच्या सध्याच्या आणि नव्या प्रीपेड ग्राहकांपर्यंत पोहोचवताना आम्हाला अतिशय आनंद होत आहे. ग्राहकांना अतिशय स्वस्तात फोर-जी स्मार्टफोन उपलब्ध करून देऊन व्होडाफोन सुपरनेट फोर-जी सेवेचे लोकशाहीकरण करण्यासाठी हा पुढाकार घेण्यात आला आहे. यामुळे स्मार्टफोनची आकांक्षा बाळगणाऱ्या, पण तो महाग असल्याने खरेदी करणे शक्य नसलेल्या देशातील लाखो मोबाइल फोनधारकांची इच्छा पूर्ण होईल, अशी आम्ही आशा करतो. सध्या फोर-जी सेवा वापरत नसलेल्यांना फोर-जी सेवा वापरण्यास उद्युक्त करण्यासाठी आणि व्होडाफोन सुपरनेट फोर-जीचा समृद्ध अनुभव घेण्यासाठीही यामुळे प्रोत्साहन मिळेल.’

फ्लिपकार्टच्या स्मार्टफोन विभागाचे वरिष्ठ संचालक अय्यप्पन राजगोपाल म्हणाले, ‘ग्राहकांना निवडीला भरपूर वाव असलेला आणि अतिशय चांगल्या योजना उपलब्ध असलेला खरेदी अनुभव देण्यावर फ्लिपकार्टचा भर असतो. आम्ही व्होडाफोनशी केलेले सहकार्य हे देशातील प्रत्येकाला स्मार्टफोन तंत्रज्ञान परवडणाऱ्या दरांत उपलब्ध करून देण्याच्या फ्लिपकार्टच्या धोरणाशी सुसंगत आहे.’
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link