Next
अभिशाप
BOI
Thursday, November 01 | 10:14 AM
15 0 0
Share this story

वाल्मिकी रामायणात उल्लेख आढळणाऱ्या इल-इला या उभय व्यक्तिमत्त्वाची कथा चंद्रहास शेट्ये यांनी ‘अभिशाप’मधून सांगितली आहे. महाराज वैवस्वत मनू श्राद्धदेव यांना दहाव्या पुत्राची इच्छा झाली. मनुपत्नी श्रद्धादेवींना नऊ पुत्रांच्या पाठी कन्याप्राप्तीची तीव्र इच्छा असते. त्यानुसार इला या कन्यारत्नाचा जन्म झाला; मात्र राजाज्ञेमुळे वसिष्ठांनी तिचा कायापालट करून इल (सुद्युम्न) या राजपुत्रात तिचे रूपांतर केले. गुरुगृही शिक्षण संपल्यानंतर इलला त्याच्या जन्माची चर्चा ऐकू आल्याने तो व्यथित होतो. तेथून त्याच्या अभिशापास सुरुवात होते. प्रथम स्त्री म्हणून जन्मल्याने त्याला राज्याधिकार नाकारण्यात येतो; पण वसिष्ठांच्या आग्रहानंतर इल उर्फ सुद्युम्न राजगादीवर बसतो. मृगयेसाठी गेला असताना शापग्रस्त वनामुळे त्याचे रूपांतर पुन्हा इलात (स्त्रीरूप) होते. तिची बुधाशी भेट होऊन पुरुरवाचा जन्म होतो. वसिष्ठांच्या मध्यस्थीने तिला पुन्हा पुरुषत्व प्राप्त झाले, तरी ते एका महिन्यासाठीच मिळते. त्यानंतर त्याचे पुन्हा स्त्रीमध्ये रूपांतर होते. एकाच जन्मात इल व इला अशी दोन्ही रूपे जगावी लागत असतानाची मानसिक व शारीरिक वेदनांची वेगळी जीवनकहाणी या पुस्तकात वाचायला मिळते. 

पुस्तक : अभिशाप
लेखक : चंद्रहास शेट्ये
प्रकाशन : ऋचा प्रकाशन
पृष्ठे : २४० 
मूल्य : २८० रुपये

(‘अभिशाप’ हे पुस्तक ‘बुकगंगा डॉट कॉम’वरून थेट घरपोच मागविण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.)


 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link