Next
‘जेट एअरवेज’ची ‘उडान’ विमानसेवा योजना
प्रेस रिलीज
Wednesday, May 16, 2018 | 04:57 PM
15 0 0
Share this storyमुंबई : भारतातील आघाडीची पूर्ण सेवा देणारी आंतरराष्ट्रीय विमान वाहतूक कंपनी जेट एअरवेजने ‘उडे देश का आम नागरिक’ (उडान) योजनेखाली विमानसेवांची नुकतीच घोषणा केली.

विमान कंपनीला चार नवे मार्ग रिजनल कनेक्टिविटी स्कीम्स अर्थात आरसीएसखाली प्रदान करण्यात आले असून, यापैकी तीन मार्गांवर कंपनी आत्ता सेवा सुरू करणार आहे आणि त्यानंतर लखनौ-बरेली-दिल्ली-बरेली-लखनौ या चौथ्या मार्गावरही सेवा सुरू करणार आहे.  

यावेळी जेट एअरवेजचे होल टाइम संचालक गौरांग शेट्टी म्हणाले, ‘भारताला ‘उड्डाण आनंदाच्या’ स्वरूपात एक जागतिक दर्जाचा प्रवासाचा अनुभव आणि कनेक्टिव्हिटी देण्याच्या उद्देशानेच जेट एअरवेज ही कंपनी सुरू झाली आहे. या नवीन विमानसेवांच्‍या दाखलीकरणानंतर एअर जेटवेजने विमानसेवेचा फारसा लाभ न झालेल्या भागांना सेवा देण्याचा तसेच पूर्ण क्षमतेने न वापरल्या जाणाऱ्या विमानतळांची क्षमता जास्तीत जास्त वापरून घेण्याचा प्रवास सुरू केला आहे. हवाई वाहतूक क्षेत्राच्या क्षमतांचा पूर्ण लाभ घेण्यासाठी आणि भारताच्या विविध भौगोलिक प्रदेशांपर्यंत पोहोचण्यासाठी उडान योजना हा एक उत्तम उपक्रम आहे. भारताच्या सर्व भागांत व्यापार व पर्यटनाच्या विकासाला उत्तेजन देण्याच्या हेतूने कनेक्टिविटी वाढवण्याचा प्रयत्न आम्ही सातत्याने करत असतो.’

एटीआर विमानांची मुहूर्तमेढ भारतात रोवल्यानंतर, या नवीन मार्गांवर प्रामुख्याने एटीआर विमानांद्वारे सेवा देऊन विमानसेवेचा फारसा लाभ न झालेल्या भागांना सेवा देण्याचा तसेच पूर्ण क्षमतेने न वापरल्या जाणाऱ्या विमानतळांची क्षमता जास्तीत जास्त वापरून घेण्याचा प्रवास जेट एअरवेजला सुरू करता येईल. हवाई वाहतूक क्षेत्राच्या क्षमतांचा पूर्ण लाभ घेण्यासाठी आणि भारताच्या विविध भौगोलिक प्रदेशांपर्यंत पोहोचण्यासाठी उडान योजना हा एक उत्तम उपक्रम आहे. भारताच्या सर्व भागांत व्यापार व पर्यटनाच्या विकासाला उत्तेजन देण्याच्या हेतूने कनेक्टिविटी वाढवण्याचा प्रयत्न आम्ही सातत्याने करत असतो.

१४ जूनपासून, जेट एअरवेज लखनौ-अलाहाबाद-पाटणा मार्गावर आठवड्यातून तीनवेळा सेवा देईल. जेट एअरवेजचे ९डब्ल्यू ३५५५ हे विमान लखनौहून सकाळी सहा वाजता उड्डाण करेल आणि ७.३५ वाजता अलाहाबाद विमानतळावर उतरेल. पुढे हेच ९डब्ल्यू ३५५८ विमान आठ वाजता अलाहाबादवरुन पाटण्याच्या दिशेने उड्डाण करेल आणि ९.४० वाजता पाटणा विमानतळावर पोहोचेल. परतीच्या प्रवासासाठी विमान ९डब्ल्यू ३५५७ पाटण्याहून १०.१० वाजता उड्डाण करेल आणि ११.५० वाजता अलाहाबादला पोहोचेल. नंतर हेच विमान ९डब्‍ल्‍यू ३५५६ अलाहाबादहून १२.२० वाजता उड्डाण करेल आणि एक वाजता लखनौला पोहोचेल. या मार्गावर जेट एअरवेजच्या एटीआर विमानाद्वारे सेवा दिली जाईल.

१५ जूनपासून सुरू होणारी जेट एअरवेजची नवी दिल्ली आणि नाशिकदरम्यानची सेवाही आठवड्यातून तीन दिवस उपलब्ध असेल. विमान क्रमांक ९डब्ल्यू ३५६५ नवी दिल्लीहून १२ वाजता निघेल आणि १.०५ वाजता नाशिकला पोहोचेल. परतीच्या प्रवासात ९डब्ल्यू ३५६६ हे विमान १.३५ वाजता नाशिकहून निघेल आणि ४.२५ वाजता नवी दिल्लीत पोहोचेल. या मार्गावर बोईंग ७३७ या विमानाद्वारे सेवा दिली जाईल.

१६ जूनपासून सुरू होणारी नागपूर-अलाहाबाद-इंदोर मार्गावरील सेवाही आठवड्यातून तीन वेळा उपलब्ध असेल. जेट एअरवेजचे विमान क्रमांक ९डब्ल्यू ३५५३ नागपूरहून ९.४५ वाजता उड्डाण करेल आणि ११.५० वाजता अलाहाबाद विमानतळावर उतरेल. पुढे ९डब्ल्यू ३५५२ हे विमान अलाहाबादहून १२.२० वाजता निघेल आणि इंदोरला २.२० वाजता पोहोचेल. परतीच्या प्रवासात विमान क्रमांक ९डब्ल्यू ३५५१ इंदोरहून ३.१० वाजता निघेल आणि अलाहाबादला ४.१५ वाजता पोहोचेल. पुढे ९डब्ल्यू ३५५४ अलाहाबादहून ५.४० वाजता निघेल आणि नागपूर विमानतळावर ७.४५ वाजता दाखल होईल.

उडान योजनेअंतर्गत विमानसेवा लखनौ-अलाहाबाद-लखनौ मार्गावर ९६७ रुपये* दराच्‍या आरसीएस आसनांसह नवीन विमानांची सुविधा देणार आहे. तर पाटणा-अलाहाबाद-पाटणा मार्गावर आरसीएस आसनांसाठी दर १ हजार २१६ रुपये* असेल.

(Please click here to read this news in English.)
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link