Next
जिओफोनवरही आता फेसबुक
प्रेस रिलीज
Wednesday, February 14 | 04:37 PM
15 0 0
Share this story

मुंबई : फेसबुक हे स्मार्टफोन जिओफोनवर वापरणे शक्य होणार आहे. ‘न्यू व्हर्जन ऑफ फेसबुक अॅप’ हे जिओच्या ‘KaiOs’ हे वेब बेस ऑपरेटींग सिस्टिमवर आधारीत आहे. जिओफोनसाठी हे विशेष अॅप्लिकेशन उपलब्ध या ऑपरेटींग सिस्टिमच्या माध्यमातून उपलब्ध करून देण्यात आले आहे. या फेसबुक अॅप्लिकेशनचा उपयोग भारतातील ५० कोटी वापरकर्त्यांना होईल.

नव्या फेसबुक अॅपच्या माध्यमातून अनेक फीचर फोन वापरकर्त्यांमधील गरजू अशा व्यक्तींना फेसबुक वापरणे शक्य होईल. या अॅपच्या माध्यमातून पुश नोटीफिकेशन, व्हिडिओ, वेब बेस ऑपरेटींग सिस्टिम यासाठी एक्सटरनल सपोर्ट मिळतो. अॅपमध्ये कर्सरचा पर्यायही आहे. त्यामुळे फेसबुकवरील न्यूजफीड आणि फोटो अशा प्रसिद्ध फीचरच्या वापरासाठी त्याचा उपयोग होईल.

‘या परवडणाऱ्या फीचरफोनच्या माध्यमातून ग्राहकांना स्मार्टफोनसारखा अनुभव देण्याचा जिओफोनचा प्रयत्न आहे. याआधीच आश्वासन दिल्याप्रमाणे जिओफोनवर आम्ही जगभरात सर्वात अग्रेसर एप्लिकेशन देऊ करत आहोत, त्याची सुरूवात फेसबुकच्या माध्यमातून होत आहे. भारतातल्या प्रत्येक ग्राहकाला डेटा आणि जिओ फोनच्या माध्यमातून सक्षम करण्याचा जिओ चळवळीचा उद्देश आहे,’ असे रिलायन्स जिओचे संचालक आकाश अंबानी यांनी सांगितले.

‘जिओफोन वापरकर्त्या लाखो ग्राहकांना ही सेवा देण्यासाठी आम्ही उत्सुक होतो, या कराराच्या माध्यमातून आम्ही अतिशय उत्तम सेवा देणार आहोत असे फेसबुकच्या मोबाईल पार्टनरशीपचे उपाध्यक्ष फ्रान्सिस्को वेरेला यांनी सांगितले. फेसबुकच्या आणि जिओ माध्यमातून प्रत्येकाला डेटा आणि जिओफोनवर कनेक्ट करण्यासाठी आम्ही सक्षम करत आहोत,’ असेही त्यांनी स्पष्ट केले.
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link